मुंबई - राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. आज सकाळीच विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवरती मराठा आरक्षण आणि राज्या होणाऱ्या महिलांवरील अत्याचारांसदर्भात सरकारला घेण्यासाठी आंदोलन केले आहे. त्यामुळे आजचा दिवस हा वादळी होण्याची शक्यता आहे. तसेच विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. आज राज्याचा अर्थसंकल्प अहवालदेखील मांडण्यात येणार आहे. त्यामुळे आजचा दिवस चर्चेचा राहणार आहे.
विरोधक आक्रमक -
विरोधक गेल्या पाच दिवसांपासून रोज विधानभवनाच्या पायऱ्यांवर वेगवेगळ्या मुद्द्यांवर आंदोलन करत आहेत. त्यामुळे सरकारचे या सगळ्या मुद्द्यांवर लक्ष वेधण्याकरिता विरोधक या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जास्तच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कालचा दिवस हा संपूर्ण महिला अत्याचारांविरोधात गाजलेला होता. आजदेखील हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा ठरणार आहे. कारण राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांच्या अत्याचारांविरोधात कोणत्या ना कोणत्या घटना घडत आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आज विधानसभेच्या पटलावरती विरोधीपक्ष मांडणार आहे. तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज कोल्हापुरातील कोविड साहित्यातील घोटाळा यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित करून या सगळ्या संदर्भात जाब सुद्धा विचारणार आहेत.
हेही वाचा - वरळीत एसओपी धुडकवणाऱ्या पबवर कारवाई करणार; पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती