मुंबई : शिस्तभंगाच्या कारवाईचा सामना करत असलेली महिला पोलीस अधिकारी तिच्या मुंबईतील घरात मृतावस्थेत आढळली. परिमंडळ 6 चे पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांनी सांगितले की, शीतल आडके असे या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. तिचे वय अंदाजे 35 वर्षे आहे. गेल्या दीड वर्षापासून ती आजारपणाच्या रजेवर होती. मूळची ती महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील आहे. मुंबईत भाड्याच्या घरात राहत होती. तिचे लग्न झालेले नव्हते. प्राथमिक तपासात पोलिसांना आत्महत्येचा संशय येत आहे. शेजारी राहणाऱ्यांनी पोलिसांना कळवले. नंतर दरवाजा तोडून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. सध्या अपमृत्यूची नोंद दाखल केली जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांनी दिली आहे.
शिस्तभंगाच्या कारवाईचा सामना : कामावर दीर्घकाळ गैरहजर राहिल्यामुळे शिस्तभंगाच्या कारवाईचा सामना करत असलेली 30 वर्षीय महिला पोलीस उपनिरीक्षक कुर्ला (पूर्व) येथील मुंबई उपनगरातील तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली. शीतल आडके कुर्ला (पूर्व) येथील नेहरू नगर पोलीस ठाण्यात तैनात होती. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही, त्यांनी सांगितले, पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. आडके ही फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
मृत्यू उघडकीस आला : अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, शीतल आडके ही एका वर्षाहून अधिक काळ सुट्टीवर होती. त्यामुळे तिच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून पीएसआयच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली, तेव्हा तिचा मृत्यू उघडकीस आला. मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती. मृतदेहाला नागरी संचालित रुग्णालयात शवविच्छेदन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले, चौकशी सुरू आहे. पोलिसांना अनेक ताण-तणावाच्या स्थितीला सामोरे जावे लागते. त्यामुळे पोलिसांमधील आत्महत्या आणि ह्रदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे.