मुंबई The Elephant Toy Library : आजपर्यंत आपण पुस्तकांचं ग्रंथालय (Book Library) पाहिलं असेल, पण लहानग्यांसाठी खेळण्याची लायब्ररी म्हटलं तर आपल्याला विश्वास बसणार नाही. लहान मुलांसाठी मालाडमध्ये सौरभ जैन यांनी 'द एलिफंट टॉईज' ही लायब्ररी सुरू केलीय. खेळण्यांच्या या नवीन संकल्पनेला पालकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आपल्या मुलीला हवी होती ती खेळणी न मिळाल्यामुळं लहान मुलांसाठी 'द एलिफंट टॉईज' ही लायब्ररी सुरू करण्यात आलीय.
घरपोच खेळणी कशी मिळवाल? : 'द एलिफंट टॉईज लायब्ररी'चे ॲप आहे. त्या ॲपवर जाऊन, तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचा पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर वयाची कॅटेगरी म्हणजे एक ते पाच, पाच ते पंधरा मुलांच्या वयानुसार कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला सबस्क्रीप्शन घ्यावं लागेल. हे सबस्क्रीप्शन एक महिन्यापासून ते एक वर्षापर्यंत आहे. यात तुम्ही सबस्क्रीप्शन घेतल्यानंतर कॅटेगिरी आणि पत्ता, पिनकोड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला मोफत घरपोच खेळणी मिळू शकणार आहे. यामध्ये एका महिन्याच्या सबस्क्रीप्शनमध्ये तुम्ही दोन वेळा खेळणी बदलू शकता.
खेळण्यांसाठी किती पैसे मोजावे लागतात? : मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमधून 'द एलिफंट टॉईज' ॲप डाऊनलोड केल्यानंतर, त्यामध्ये एक महिन्यापासून एक वर्षापर्यंत सबस्क्रीप्शन आहेत. एक महिन्याच्या सबस्क्रीप्शनसाठी 899 रुपयांपासून ते एका वर्षापर्यंत 9 हजार रुपयांपर्यंत सबस्क्रीप्शन आहेत. यात विविध प्रकारचे 500 लहान मुलांसाठी खेळणी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे ही सर्व खेळणी अतिशय ब्रॅडेन्ड आणि टिकाऊ आहेत, त्यामुळं लहान मुलांकडून ही खेळणी तुटणार किंवा फुटणार नाहीत.
टॉईज लायब्ररीनं आमच्या मुलांना आनंद दिला : 'द एलिफंट टॉईज' या लायब्ररीतून खेळणी घेतलेल्या पालकांनी यावेळी प्रतिक्रिया देताना समाधान व्यक्त केलंय. आम्ही आमच्या लहान मुलांसाठी खेळणी बाजारात शोधत होतो, पण आम्हांला मनासारखी खेळणी मिळाली नाहीत. पण आम्ही इंटरनेटवर 'द एलिफंट टॉईज' लायब्ररीबद्दल समजलं. यानंतर मोबाईल अॅपवरुन खेळण्यांची ऑर्डर दिली. मग आम्हांला मोफत घरपोच कित्येक प्रकारची खेळणी मिळाली. दरम्यान, विविध प्रकारची, विविध रंगाची, कित्येक प्राण्यांची, अनेक पक्ष्यांची खेळणी खेळून लहान मुलांना प्रचंड आनंद मिळतो. जी खेळणी बाजारात मिळत नाहीत, ती खेळणी 'द एलिफंट टॉईज' या लायब्ररीतून मिळते. त्यामुळं आम्ही इथूनच खेळणी घेतो, अशा आनंदी प्रतिक्रिया पालकांनी दिल्या.
हेही वाचा -