ETV Bharat / state

शेतकऱ्यांचा 'विराट' मोर्चा : डॉ. नवले यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ची खास बातचित - farmers protest news

शेतकरी आणि कामगार कायद्यांच्या विरोधात राजभवनवर मोर्चासाठी नाशिकहून निघालेले शेतकरी आंदोलक काल (रविवार) मुंबईत दाखल झाले. आझाद मैदानात आज होणाऱ्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आदी सहभागी होणार आहेत.

farmers protest akhil bharatiya kisan sabha morcha reached mumbai morcha held raj bhavan
शेतकऱ्यांचा 'विराट' मोर्चा : डॉ. नवले यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ची खास बातचित
author img

By

Published : Jan 25, 2021, 9:57 AM IST

Updated : Jan 25, 2021, 10:13 AM IST

मुंबई - शेतकरी आणि कामगार कायद्यांच्या विरोधात, राजभवनवर मोर्चासाठी नाशिकहून निघालेले शेतकरी आंदोलक काल (रविवार) मुंबईत दाखल झाले. आझाद मैदानात आज होणाऱ्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आदी सहभागी होणार आहेत. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेच्या नेतृत्वाखाली राज्याच्या २१ जिल्ह्यामधून शेतकरी व कामगार हे नाशिकहून मुंबईत दाखल झाले. याबाबत आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांच्याशी बातचीत केली. पाहा काय म्हणाले नवले...

शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांच्याशी बातचित करताना आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड

शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगार विरोधी बदल रद्द करा, वनजमीन तथा देवस्थान, गायरान, आकारीपड, बेनामी व वरकस जमीन कसणारांच्या नावे करा आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या, या मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.

महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि आदित्य ठाकरे, डावे व लोकशाही पक्ष यांचे प्रमुख नेते आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाचे एक प्रमुख नेते माजी खासदार हनन मोल्ला या सभेस संबोधित करणार आहेत, असे नवले यांनी सांगितले.

हेही वाचा - LIVE : शेतकरी मोर्चाची आज मुंबईतील आझाद मैदानावर सभा, राजभवनाला घालणार घेराव

हेही वाचा - मुंबई : आरपीएफ कर्मच्यांऱ्याना प्राथमिक वैद्यकीय सेवा प्रशिक्षण

Last Updated : Jan 25, 2021, 10:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.