ETV Bharat / state

मुंबई : ...अखेर 'त्या' प्रकरणात डॉ. मनीष त्रिपाठी पोलिसांना शरण

आतापर्यंत फरार असलेल्या त्रिपाठी याने अटकेच्या भीतीने दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्रिपाठीने हा अर्ज अ‍ॅड. आदिल खत्रीच्या मार्फत केला होता. आपण पोलिसांना तपासात सहकार्य केल्याचे आणि १५ जूनला जबाबही नोंदवल्याचा दावा त्रिपाठी याने अर्जात केला होता.

मुंबई लसीकरण प्रकरण
मुंबई लसीकरण प्रकरण
author img

By

Published : Jun 29, 2021, 8:11 PM IST

मुंबई - मुंबईतील कांदिवली येथील हिरानंदानी हेरिटेज गृहसंकुलात बनावट लसीकरण केल्या प्रकरणातील आरोपी डॉ. मनीष त्रिपाठी आज (मंगळवार) शरण आला आहे. त्याने अटकेच्या भीतीने या आधी दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीनाची मागणी केली होती. तसेच, त्याने या बनावट लसीकरणामागे 'शिवम' रुग्णालय असल्याचा हात असल्याचे सांगितले होते. शिवाय त्याच्या मालकाचे राजकीय नेत्यांशी संबंध असल्याने पोलीस रुग्णालयाला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचा दावा अटकपूर्व जामीनाची मागणी करताना केला होता. हा बनावट लसीकरणाचा प्रकार गेल्या आठवड्यात उघडकीस आला होता. आतापर्यंत फरार असलेल्या त्रिपाठी याने अटकेच्या भीतीने दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्रिपाठीने हा अर्ज अ‍ॅड. आदिल खत्रीच्या मार्फत केला होता. आपण पोलिसांना तपासात सहकार्य केल्याचे आणि १५ जूनला जबाबही नोंदवल्याचा दावा त्रिपाठी याने अर्जात केला होता.

काय आहे प्रकरण?

लस घोटाळाप्रकरणी कांदिवलीतील हिरानंदानी हेरिटेजमधील नागरिकांना दिलेल्या बनावट प्रमाणपत्रावर नमूद केलेल्या लसींच्या बॅचचा वापर कुठे केला, त्याची माहिती देण्याचे आदेश २७ रुग्णालयांना पालिकेने दिले आहेत. कांदिवलीच्या हिरानंदानी हेरिटेजमधील जवळपास १०० नागरिकांना बनावट लस दिल्याचे समोर आल्यानंतर नानावटी, लाइफ सायन्स आणि गोरगाव नेस्को रुग्णालयाच्या नावाने बनावट प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले होते. यावर कोव्हिशील्ड लसीच्या चार बॅचचे क्रमांक नमूद केलेले आहेत. या बॅचच्या लसी कोणत्या रुग्णालयांना दिल्या होत्या, याची माहिती पालिकेने सीरम इन्स्टिट्यूटकडे पत्राद्वारे मागितली होती. ही माहिती इन्स्टिट्यूटने पालिकेला कळविली आहे. बोगस लसीकरणाबद्दलची तक्रार कांदिवली येथील हिरानंदानी हेरिटेज गृहसंकुलातील नागरिकांनी केली होती. येथे आयोजित लसीकरण शिबिरात प्रतिडोस १२६० रुपये आकारले जात होते. आता मुंबई शहरात याप्रकरणात विविध ठिकाणी बोगस लसीकरण शिबिर आयोजित करणाऱ्या या टोळीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी ८ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १२ लाख ४० हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. ही रक्कम या टोळीने फसवणूक करुन मिळवल्याची माहीती आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.