मुंबई - आमचे सरकार येऊन तीन महिने झाले तरीही फेक कथानक तयार करण्यात येत आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी केला आहे. हा महाराष्ट्राच्या बदनामीचा विरोधक करत आहेत. सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार होता, आता आम्ही विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याचा प्रयत्न केला आहे.महाराष्ट्राला केंद्र सरकार टेक्सटाइल पार्क देणार आहे. यासोबत टेक्सटाइल क्लस्टर त्य़ातून तयार होईल, अशी अपेक्षा आहे. बजेटपूर्वी हा प्रकल्प घोषित होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारला केंद्राने मोठी भेट दिली असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis )यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.
महाराष्ट्रात 25 हजार कोटींचे प्रकल्प येणार - महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव महाविकास आघाडीने सुरू ठेवला. आमचे सरकार येण्यापूर्वी सर्व भ्रष्टाचार होता, महाराष्ट्रात कोणीही यायला तयार नव्हते. आम्ही ही घडी पुन्हा बसवण्याचा प्रयत्न केला असल्याचे फडवणीस म्हणाले. पुढे महाराष्ट्रात २५ हजार कोटींच्या प्रकल्पाचे प्रस्ताव येत आहे. गुंतवणुकीचा बाप सर्वात मोठी रिफायनरी आहे. ३ लाख कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक असेल. तर १ लाखांपेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
वेदांत -फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क प्रकल्पाबाबत काय म्हणाले - महाराष्ट्रातून गुजरातमध्ये प्रकल्प गेल्यामुळे विरोधक आरोप करत आहेत. ते लोक आज बोलत आहेत, त्यांनीच ही गुंतवणूक परत पाठवली. पण तुमचे सरकार होते तेव्हा महाराष्ट्राची संवेदना कुठे गहाण होती, असा सवाल त्यांनी विरोधकांना केला आहे. मेडिकल डिव्हाईस किंवा बल्क ड्रग प्रकल्प केंद्राने महाराष्ट्राला देणार असे कधीही केंद्राने म्हटले नव्हते, म्हणून हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेले असे कसे म्हणता येईल.महाराष्ट्र गुंतवणुकीपासून वंचित राहावं, प्रकल्पांबाबत महाविकास आघाडीने रचलेले षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
रवी राणा- बच्चू कडू वाद संपला - शिवसेनेतून हे जे लोक गेले ते शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून गेले म्हणून पैशांचा कुठेही संबंध येत नाही, तर दुसरीकडे रवी राणा हे रागात बोलले असल्यामुळे, त्यांना मी सांगितले रागा रागात केलेली विधाने योग्य नाही. काल मी आणि मुख्यमंत्री यांची भेट झाली आहे, म्हणून आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादाचा विषय संपला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले.