ETV Bharat / state

TV Actress Allegations : खोटे लग्न, लैगिक छळासह डांबून ठेवले; टीव्ही अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप - Fake marriage

टीव्ही सीरियलमध्ये काम करणाऱ्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने (TV Actress Allegations ) तीची लग्नाच्या नावाखाली फसवणूक केली तसेच तीला खोट्या लग्नानंतर (Fake marriage ) लैंगिक छळासह (sexual harassment) ४ महिने कोंडून ठेवल्याचा आरोप केला ( sensational allegations by TV actress) आहे. यामुळे मनोरंजन जगतात खळबळ उडाली आहे.

TV Actress
टीव्ही अभिनेत्री
author img

By

Published : Oct 13, 2022, 2:57 PM IST

Updated : Oct 13, 2022, 3:15 PM IST

मुंबई : खोटे लग्न आणि फसवणुकीचे एक प्रकरण समोर आले आहे. यात एकाने आपल्या पेक्षा अर्ध्या वयाच्या मुलींशी लग्न केले आणि नंतर तीचे शारीरिक शोषणही करत तीला डांबुन ठेवल्याचे आरोप आहेत. अनेक वेळा प्रतिष्ठा आणि पैसा अशा कारणाने अशी प्रकरणे दाबवी जातात. तर अनेक वेळा मुलींना धमकावून किंवा समाजाचा धाक दाखवून गप्प केले जाते. असाच काहीसा प्रकार अलीकडेच एका टीव्ही शोमध्ये दिसलेल्या अभिनेत्रीसोबत घडला आहे. तीच्या सोबत एकाने खोटे लग्न करून नंतर शारीरिक व मानसिक अत्याचार केले आहे. या संपूर्ण जाळ्यात ती कशी अडकली आणि लग्नाच्या नावाखाली तिची कशी फसवणूक झाली, याचा तीने स्वत:च खुलासा केला आहे.

काय आहेत आरोप : अभिनेत्रीने सांगितले की, मेहमूद हसन कादरी यांनी तिला लग्नाचे वचन दिले होते तिने काही पाहुण्यांच्या उपस्थितीत एका खाजगी हॉटेलमध्ये लग्न केले. लग्नानंतर हसन कादरीचा खरा चेहरा समोर आला. हसन कादरी याने तिला चार महिने कोंडून ठेवले आणि कोणालाही भेटू दिले नाही. तो तिला मारहाण करायचा. त्याने तीच्या अंगावरील टॅटू काढण्यासाठी मेणबत्ती पेटवून चटके दिले. त्याच्या वाढत्या अत्याचाराला कंटाळून तीने प्रथम ओशिवरा पोलिसांशी संपर्क साधला परंतु त्यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.

रात्री २ नंतर भेटायला यायचा : मला माहीत होते की त्याला बायको आहे. त्याला दोन बायका आहेत हे मला माहीत नव्हते. पण हसनच्या कुटुंबीयांनी माझी समजूत घातली आणि तो खूप छान आहे, असे सांगून मला त्यांच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर हसन कादरी यांनी ओशिवरा येथील लष्करिया येथे फ्लॅट भाड्याने घेतला. त्यांने आश्वासन दिले की मी तुझ्यासाठी लोखंडवाला येथे एक फ्लॅट आणि दोन दुकाने विकत घेईन आणि मला देईन. तुला सुरक्षा मिळेल. मला खात्री दिली की ती जागा भाड्याची आहे आणि ती स्वतः विकत घेऊन तुला देणार आहे. मी तिथे राहू लागले. एक दिवस सोडून तो रात्री तिथे येत असे. तो नेहमी रात्रीचा यायचा, दिवसा कधीही येत नसे. तो फक्त रात्री दोन वाजल्यानंतरच यायचा. निकाहासाठी त्याने माझ्यावर जबरदस्ती केली आणि संबंध ठेवण्याचा आग्रह धरला. मी म्हणालो की मी लग्नापूर्वी या सर्व गोष्टी करत नाही. हा गुन्हा आहे.

जखमी अवस्थेत सोडले : तिने त्या दिवसाची शोकांतिका कथन केली. ती म्हणाली, आणि माझी तब्येत खूप खराब झाली. मी रडत रडत परत आले. माझा खूप छळ केला. त्यांनी आपल्या मुलाला बोलावून सांगितले की लवकर ये, हिला धडा शिकवायचा आहे. ते सर्व लोक गाडी घेऊन आले आणि मी गाडीतून खाली उतरून बॅग घेऊन रिक्षाने घरी आले. मी भावांना सांगितल्यावर ते म्हणाले की चूक माणसाकडून होत असते माफी माग. मी सॉरी म्हटल्यावर त्याने फटकारले आणि फोन ठेवला. चार दिवसांनी फोन केला आणि म्हणाला मी येतोय, तयार रहा. रात्री ये आणि मग माझ्याशी संबंध ठेव. मी म्हणालो की, तू म्हणत होतास की आपण निकाह करू. पण त्याने मला खडसावले. रात्री 2 वाजता तो यायचा आणि सकाळी 7 वाजता शारीरिक संबंध ठेवुन मला जखमी अवस्थेत सोडून जायचा.

अखेर एफआयआर दाखल : कादरीचे वाढते अत्याचार सहन करत असलेल्या अभिनेत्रीने पहिल्यांदा ओशिवरा पोलिसांना संपर्क साधला. परंतु त्यांनी गुन्हा नोंदवायला नकार दिला.तीनेे नंतर तिची तक्रार घेऊन तत्कालीन गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी एफआयआर लिहिला. तीला महमूद हसन कादरी याने अँटी इस्टेशन सेलची धमकी दिली होती. त्यानंतर ओशिवरा पोलिसांनी महमूद हसन कादरीविरोधात एफआयआर नोंदवला, असेही ती म्हणाली.

Last Updated : Oct 13, 2022, 3:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.