ETV Bharat / state

कॅन्सरचे बोगस प्रमाणपत्र बनवून रेल्वेला लाखोंचा चुना, घोटाळा उघड - कॅन्सर

कॅन्सरचे बोगस प्रमाणपत्र बनवून रेल्वेमध्ये सवलतीद्वारे कन्फर्म तिकीट मिळवून सवलत लाटल्याचे प्रकरण समोर आले आहे.

कॅन्सरचे बोगस प्रमाणपत्र बनवून रेल्वेला लाखोंचा चुना, घोटाळा उघड
author img

By

Published : May 7, 2019, 6:48 PM IST

मुंबई - कॅन्सरचे बोगस प्रमाणपत्र बनवून रेल्वेमध्ये सवलतीद्वारे कन्फर्म तिकीट मिळवून सवलत लाटल्याचे प्रकरण समोर आले आहे. प्रसिद्ध रुग्णालयाच्या डॉक्टरकडून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून एक टोळीने सवलत घेतल्याचा घोटाळा उघड झाला आहे.

कॅन्सरचे बोगस प्रमाणपत्र बनवून रेल्वेला लाखोंचा चुना, घोटाळा उघड

रेल्वेमध्ये कॅन्सर रुग्णांना कन्फर्म बर्थसोबत टिकीटामध्ये ५० टक्के सवलतही दिली जाते. या गोष्टीचा फायदा घेऊन एक टोळी नामवंत रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून कॅन्सरचे प्रमाणपत्र बनवून तिकीट बुकींग करत असल्याची माहिती रेल्वेच्या व्हिजिलन्स पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे व्हिजिलन्स पथकाचे अधिकारी मनोज यादव व सौरभ म्हसेकर यांनी दादरच्या पॅसेंजर आरक्षण कक्षामध्ये पाळत ठेवून सापळा रचला. दरम्यान त्यांना दादरच्या पीआरएस केंद्रातून ७४ रुग्णांची बोगस प्रमाणपत्रे मिळाली.

याप्रकरणी अधिक तपास केल्यानंतर जबलपूरपर्यंत या प्रकरणाचा संबंध असल्याचे समोर आले आहे. या तपासात सूरज कुमार पांडे नावाचा प्रवासी कॅन्सरच्या सवलतीत प्रवास करत असल्याचे उघड झाल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू असून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वापरण्यात आलेल्या डॉक्टरांचा सहभाग आहे का? याचा तपास केला जाणार आहे. मात्र, यामध्ये अद्याप कोणत्याही रेल्वे कर्मचाऱ्याचा सहभाग नसल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले आहे.

Intro:रेल्वेत कँसरच्या सवलतीद्वारे कन्फर्म तिकीट मिळत असल्याने प्रसिद्ध हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून मेडिकल सर्टिफिकेट मिळवून रेल्वेची सवलत घेतल्याचा नवीन घोटाळा समोर आला आहे.

Body:रेल्वेमध्ये कँसर रुग्णांना कन्फर्म बर्थसोबत 50 टक्के तिकिटातही सवलत दिली जाते. या गोष्टीचा फायदा घेऊन एक टोळी नामवंत हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून कँसरचे प्रमाणपत्र सादर करून तिकीट बुक करत असल्याची माहिती रेल्वेच्या व्हिजिलन्स पथकाला लागला. त्या माहितीच्या आधारे व्हिजिलन्स पथकाचे अधिकारी मनोज यादव व सौरभ म्हसेकर यांनी दादरच्या पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीममध्ये पाळत ठेवून सापळा रचला. त्यावेळी त्यांना दादरच्या पीआरएस केंद्रातून 74 बोगस पेशंटचे प्रमाणपत्र हाती लागले.

Conclusion:याचा अधिक तपास केला असता हे कनेक्शन जबलपूरपर्यंत असल्याचे समोर आले. या तपासात सूरज कुमार पांडे नावाचा प्रवासी कँसरच्या सवलतीत प्रवास करत असल्याचे उघड झाल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी अधिक चौकशी सुरू असून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वापरण्यात आलेल्या डॉक्टरांचा सहभाग आहे का हे ही तपासले जाणार आहे. मात्र यात अद्याप कोणीही रेल्वे कर्मचारी आढळून आले नसल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.