मुंबई - भाजप नेते चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडवणीस यांना या आधुनिक जगात बैलगाडीची आठवण आहे, ही चांगली गोष्ट आहे. विरोधकांच्या बोलण्याने महाविकास आघाडी सरकार अजूनही मजबूत होत आहे, असे व्यक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.
शेतकऱ्यांची परिस्थिती खूप हलाखीची -
गृहमंत्री अमित शहा यांचे भाषण मी ऐकले नाही. परंतु हा कृषी प्रधान देश आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती खूप हलाखीची आहे. त्याला जबाबदार एकच राजकीय पक्ष आहे. या देशाचा विकास व शेतकऱ्यानंबाबत ज्या भूमिका पंडित नेहरूंपासून इंदिरा गांधी यांनी घेतल्या आहेत, त्या राष्ट्रहिताच्याच आहेत.
भाजपने भविष्याबाबत बोलावे -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण मी ऐकले. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. आज पंजाबचा शेतकरी थंडीत दिल्लीत ३० दिवसांपासून बसला आहे. त्याला देशद्रोही ठरवण्याचा काम या सरकारने केले आहे. काही दिवसांपूर्वी किंवा काल काय झाले, याविषयी बोलण्यात अर्थ नाही आहे. काल त्यांनी काम केले नाही, म्हणून तुम्ही सरकारमध्ये बसला आहात. यामुळे तुम्ही आता भविष्याविषयी बोला, असा सल्ला त्यांनी भाजपाला दिला.
हेही वाचा - डहाणू-जव्हार राज्य महामार्गावर सारणी येथे भीषण अपघात; वऱ्हाड नेणारा टेम्पो उलटला