ETV Bharat / state

Facebook removed Mahatma Gandhi Photo : गांधी नग्न वाटत असतील तर तुमचा आयक्यू तपासावा लागेल - गरिबांसाठी गांधींनी कपडे त्यागले

Facebook removed Mahatma Gandhi Photo : फेसबुकवर निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी टाकलेल्या एका फोटोमुळे खळबळ उडाली आहे. महात्मा गांधींचा फोटो असलेली ही पोस्ट फेसबुकने काढून टाकली. त्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वाचा काय आहे हे संपूर्ण प्रकरण...

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 9, 2023, 3:11 PM IST

Updated : Oct 9, 2023, 5:39 PM IST

मुंबई Facebook removed Mahatma Gandhi Photo : निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांच्या फेसबुक पोस्टनंतर पुन्हा एकदा महात्मा गांधींचे फोटो चर्चेत आले आहेत. महात्मा गांधी यांची वेशभूषा जगजाहीर आहे. अंगावर फक्त एकच पंचा घालून त्यांनी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आल्यानंतर साधी राहणी अवलंबली. त्यानंतर महात्मा गांधींचे सगळेच फोटो हे पंचामध्ये आढळतात. कधीतरी खांद्यावरुन उपरणे घेतलेलेही त्यांचे काही फोटो आहेत. मात्र त्यापेक्षा जास्त काही वस्त्र परिधान केलेले गांधीजी आपल्याला पाहायला मिळत नाहीत. असाच एक फोटो महेश झगडे यांनी फेसबुकवर दिला होता. त्यामध्ये त्यांनी महात्मा गांधींना आदरांजली व्यक्त केली होती. मात्र या फोटोची गणना सेक्शुअल कंटेटमध्ये करुन फेसबुकवरुन ही पोस्ट काढून टाकण्यात आली. त्यावरुन आता संताप व्यक्त करण्यात येत आहे.

तो मिठाचा सत्याग्रह होता - महेश झगडे यांनी पुन्हा एकदा फेसबुकवर पोस्ट करुन निषेध व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये महेश झगडे म्हणतात, 'ही पोस्ट महात्मा गांधींबद्दल आहे, ज्यांच्यासमोर G-20 शिखर परिषदेदरम्यान जगातील सर्वोच्च नेत्यांनी त्यांना अलीकडेच श्रद्धांजली वाहिली होती. महात्मा गांधींनी जगाचा दर्जा उंचावला आणि म्हणूनच त्यांचे चित्र समाजाच्या मानकांविरुद्ध जाऊ शकत नाही. फोटोवरून ही नग्नता किंवा सेक्सुअल ऍक्टिव्हिटी नव्हती, तो मिठाचा सत्याग्रह होता. कृपया!!'

गरिबांसाठी गांधींनी कपडे त्यागले - झगडे यांच्या या पोस्ट नंतर त्यांच्याशी ईटीव्ही भारतने संपर्क साधला, त्यावेळीही त्यांनी फेसबुक संदर्भातील उद्विग्नता व्यक्त केली. या सोशल मीडियावर अनेकदा अनेक विकृती दिसून येतात. त्यावर झगडे यांनी बोट ठेवलं. त्याबाबत काहीही कारवाई केली जात नाही याबाबत चीड आणि खंतही त्यांनी व्यक्त केली. ईटीव्ही भारतशी बोलताना झगडे म्हणाले की, 'महात्मा गांधींची पोस्ट हटविली ही चीड आणणारी गोष्ट आहे. तुमची इच्छा नसताना काहीही घाणेरडे या माध्यमातून तुमच्यापुढे येते. ते चालतं.' असा संताप त्यांनी व्यक्त केला. गांधी नग्न वाटत असतील तर तुमचा आयक्यू तपासावा लागेल, असंच यामुळे म्हणावं लागेल. जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त करुन झगडे म्हणाले की, गरिबांसाठी गांधींनी कपडे त्यागले, त्याला तुम्ही नग्नता ठरविणार हे योग्य नाही. हे सगळं पाहिल्यावर हे जग कुठे चाललंय, असंही महेश झगडे म्हणाले.

वैद्य यांनाही अशाच प्रकारचा अनुभव - चित्रपट-टीव्ही क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्व नितीन वैद्य यांनाही अशाच प्रकारचा अनुभव आला. त्यामुळे त्यांनीही संताप व्यक्त केला. महात्मा गांधींच्यासारख्या उच्चकोटीची नेतृत्वक्षमता असणाऱ्या व्यक्तिमत्वाची जर अशा प्रकारे सोशल मीडियावर अवहेलना होत असेल तर ते योग्य नसल्याची प्रतिक्रिया आता सर्वत्र उमटत आहे. महान व्यक्तिमत्वाबद्दल या माध्यमांच्यामध्ये काम करणाऱ्यांना काहीच माहिती नाही का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

शस्त्रांशिवाय सर्वात बलशाली.... पण शांततेचा पुरस्कार करणारा असं सांगून महेश झगडे यांनी महात्मा गांधींच्या फोटोची पोस्ट केली होती. फेसबुकने ही पोस्ट काढल्यावरनं आता सोशल मीडियावर आणखी रणकंदन पेटण्याची शक्यता आहे. हे वृत्त छापेपर्यंत फेसबुकला उपरती झाली तर कदाचित त्यांची रिमूव्ह केलेली पोस्ट पुन्हा फेसबुकवर दिसेल.

हेही वाचा..

Shivendraraje Bhosale : आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचं फेसबुक पेज हॅक; सायबर सेलकडे तक्रार दाखल

Facebook Instagram verified account : ट्विटरनंतर फेसबुकसह इन्स्टाग्रामवरदेखील वापरकर्त्यांना मोजावे लागणार पैसे

Last Updated : Oct 9, 2023, 5:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.