मुंबई : राज्यात मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात विजेची मागणी केली जाते. कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज निर्मिती पुरेशा प्रमाणात होत नाही. वाढत्या विजेच्या मागणीत आणि उपलब्धतेत यामुळे मोठी तफावत येते. वीज पुरवठ्यासाठी भारनियमन लादले जाते. मुंबईतील भांडुप आणि मुलुंड, ठाणे आणि नवी मुंबईत ही छुप्या पद्धतीने लोड शेडिंग सुरू असल्याचे दिसून येत आहे. ऐन उन्हाळ्यातच लोड शेडिंग सुरू झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
400 किलो वॅट वीजपुरवठा खंडित : मुंबई महानगर प्रदेशात टाटा पॉवर, टोरंट कंपनी मार्फत, एमएसईबी अंतर्गत काही भागात वीज पुरवठा केला जातो. आज टाटा पावर कंपनीच्या थर्मल आणि हायड्रोपॉवर उत्पादन वापरून वीज निर्मिती केली. मात्र खारघर तळेगाव लाईनमध्ये ट्रॅप आल्याने 400 किलो वॅट वीजपुरवठा खंडित करावा लागला, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अचानक वीज पुरवठा खंडित केल्याने उन्हाची काहिली आणि घामाच्या धाराने मुंबईकर चांगलेच हैराण झाले.
वीज पुरवठ्याचे नियोजन आखण्यास सुरुवात : उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीमुळे चालू यंत्रणेवर ताण येतो. परिणामी बिघाड होऊन मागणी आणि पुरवठ्याचा ताळेबंद साधला जात नाही. महावितरण आणि महापारेषांनी याची दखल घेत वीज पुरवठ्याचे नियोजन आखण्यास सुरुवात केली आहे. कोळशाच्या तुटवडा होत आहे, त्यामुळे वीज निर्मितीत अडथळा येतो आहे. शिवाय, तांत्रिक अडचण आल्यास ती तात्काळ दुरुस्ती करून वीज पुरवठा पूर्ववत करावा, यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जातात.
विजेचा वापर जपून करावा : ग्राहकांनी विजेचा वापर जपून करावा, महावितरण आणि महापारेषणला सहकार्य करावे, असे आवाहनही केले जात आहे. तसेच, राज्यात अद्याप लोड शेडिंग सुरू झाले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. उस्मानाबाद जिल्हयात जानेवारीमध्ये दीड हजार वीज कर्मचारी तर, एक लाख 28 हजार कंत्राटी कर्मचारी ७२ तासाच्या संपावर गेले होते. वीज कंपन्यांचे खाजगीकरण होऊ नये या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते.