ETV Bharat / state

कर्जत-लोणावळा रेल्वे मार्गाची दुरुस्तीनिमित्त रेल्वेगाड्या रद्द; एसटी महामंडळ सोडणार १८० जादा बसेस

मध्य रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी मुंबई, पुणे, मिरज, सांगली, कोल्हापूर या मार्गावरील विविध रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. एसटी प्रशासनाने मुंबई, ठाणे, पुणे येथून नियमित बसेस व्यतिरिक्त दररोज 180 जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे.

फाईल फोटो
author img

By

Published : Jul 25, 2019, 9:32 PM IST

मुंबई - मध्य रेल्वे मार्गावरील कर्जत ते लोणावळा रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी 25 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान मुंबई-पुणे मार्गावरील बहुतांश रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळ रेल्वेच्या मदतीला धावून आले आहे. या मार्गावर 180 जास्तीच्या बसेस सोडण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी मुंबई, पुणे, मिरज, सांगली, कोल्हापूर या मार्गावरील विविध रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. एसटी प्रशासनाने मुंबई, ठाणे, पुणे येथून नियमित बसेस व्यतिरिक्त दररोज 180 जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यामध्ये मुंबई विभागातून 50, ठाणे विभागातून 50, पुणे विभागातून 70 आणि मिरज, सांगली व कोल्हापूर विभागातून 10 अशा 180 बसेसचा समावेश आहे. तसेच मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरीच्या जादा 24 फेऱ्या धावतील.

Intro:मुंबई - मध्य रेल्वे मार्गावर कर्जत ते लोणावळा दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी आज 25 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान मुंबई-पुणे मार्गावर बहुतांश रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळ रेल्वेच्या मदतीला धावून आली आहे. या मार्गावर 180 जादा बसेस सोडण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. Body:एसटी प्रशासनाने मुंबई, ठाणे, पुणे, येथून नियमित बसेस व्यतिरिक्त दररोज 180 जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. तसेच मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरीच्या जादा 24 फेऱ्या धावतील.Conclusion:मध्य रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी मुंबई, पुणे, मिरज, सांगली, कोल्हापूर या मार्गावरील विविध रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. या मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीने मुंबई विभागातून 50, ठाणे विभागातून 50, पुणे विभागातून 70, आणि मिरज, सांगली व कोल्हापूर विभागातून 10 अशा 180 जादा बसेस दररोज सोडण्यात येणार आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.