ETV Bharat / state

Extortion Email To Kirit Somaiya : किरीट सोमैया यांना 50 लाखांच्या खंडणीचा ईमेल; नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Extortion Email To Kirit Somaiya : भाजपा नेते किरीट सोमैया यांनी आरोप केलाय की, त्यांना एक खंडणीचा ईमेल मिळालाय. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नक्की त्यांच्याकडे का खंडणी मागितली, हे आपण जाणून घेऊ या.

Extortion Email To Kirit Somaiyya
किरीट सोमय्या यांना खंडणीचा ईमेल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 6:54 PM IST

मुंबई Extortion Email To Kirit Somaiya : भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमैया यांच्याकडे तब्बल 50 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी किरीट सोमैया यांनी मुंबई नवघर पोलिसांकडे तक्रार केलीय. किरीट सोमैयांच्या तक्रारीनंतर नवघर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय. आरोपीनं सोमैयांचा कथित व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 50 लाख खंडणीची मागणी केल्याचं तक्रारीत म्हटलंय.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी : भाजपा नेते किरीट सोमैया यांचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून 50 लाखांची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आलीय. त्यानुसार सोमैया यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम 385 आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नवघर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय.

50 लाख रुपयांची मागणी : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किरीट सोमैया यांच्या कार्यालयात एक मेल आला होता. त्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीनं त्यांची कथित अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिलीय. या प्रकरणी त्यांच्याकडे 50 लाख रुपयांची मागणी केलीय. ऋषीकेश शुक्ला नावानं हा ईमेल आयडी आहे. त्याद्वारे किरीट सोमैया यांच्या ऑफिसच्या ईमेल आयडीवर हा ईमेल प्राप्त झाला होता. याबाबत सोमैया यांनी रविवारी स्वतः नवघर पोलिसांकडे तक्रार केलीय. त्याबाबत नवघर पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती किरीट सोमैया यांनी दिलीय.

सोमैया यांना खंडणीसाठी ईमेल : भाजपा नेते किरीट सोमैया यांच्या संदर्भातील कथित अश्लील आणि आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप व्हायरल केल्याबद्दल, एका मराठी वृत्तवाहिनीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून तीन दिवसांची बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणावरून राजकीय आणि मीडियातील वातावरण तापलेलं आहे, असं असताना आता किरीट सोमैया यांना खंडणीसाठी ईमेल आलाय. नवघर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. सायबर पोलीसही तपासाला साहाय्य करत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलीय.

हेही वाचा :

  1. Kirit Somaiya on Ravindra Waikar: पंचतारांकित हॉटेल घोटाळ्याप्रकरणी उद्धव ठाकरेंचीही चौकशी करा- किरीट सोमैया
  2. खिचडी घोटाळ्यात ठाकरेंच्या मित्रांचा सहभाग, किरीट सोमैयांचा गंभीर आरोप
  3. Kirit Somaiya On Covid Scam : कथित व्हिडिओ क्लिपनंतर किरीट सोमय्या पुन्हा मैदानात; उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.