मुंबई : मॉडेल आणि अभिनेता अमित अंतिल ( Case against actor Amit Antil ) याच्याविरुद्ध खंडणी आणि लैंगिक छळाचा ( Extortion and sexual harassment Case ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षिण मुंबईतील ४२ वर्षीय पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, अभिनेत्याने तिच्याशी मैत्री केली, गुप्तपणे तिचे विवस्त्र फोटो काढले आणि तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्याचाच वापर करून आधी त्याने तिच्याकडून 6.5 लाख रुपये उकळले आणि पुढे 18 लाखांची मागणी केली.
काय आहे प्रकरण : हरियाणातील रहिवासी असलेल्या अंतिलने रिअॅलिटी आणि गुन्ह्यांवर आधारित टेलिव्हिजन शोमध्ये भाग घेतला आहे. 2021 मध्ये, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याने दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध रेकी शिक्षिका असलेल्या 42 वर्षीय महिलेशी मैत्री केली. त्यानंतर ते एकमेकांना भेटू लागले. त्याने सावधपणे तिचे काही खाजगी फोटो काढले आणि नंतर तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
खंडणी मागितल्यानंतर प्रकरण समोर : त्याने महिलेला सांगितले की, तिने पैसे न दिल्यास तो तिच्या मुलाला मारून टाकू शकतो आणि सुरुवातीला तिच्याकडून 95,000 रुपये आणि नंतर 5.5 लाख रुपये घेतले. तक्रारदार त्याच्या धमक्यांना घाबरत होता म्हणून तिने त्याला आतापर्यंत इतके पैसे दिले. तथापि, त्याने तिच्याकडून 18 लाख रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर तिने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला,” असे मलबार हिल पोलिस स्टेशनमधील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी आयपीसी कलम 354 A , 417 , 384 , 504, 506 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 67 चे कलम 67A अंतर्गत गुन्हा ( Case against actor Amit Antil ) दाखल करण्यात आला आहे.