ETV Bharat / state

मुंबईतील गिरणी कामगारांना म्हाडा घरांची पात्रता निश्चितीसाठी मुदतवाढ

म्हाडातर्फे गिरणीकामगारासाठी बांधण्यात आलेल्या पनवेल मधील कोन येथील २४१७ सदनिकांच्या सोडतीतील ३४६ यशस्वी गिरणी कामगार/वारसांना प्रथम सूचना पत्राच्या अनुषंगाने पात्रता निश्चितीकरिता कागदपत्रे सादर करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत अंतिम मुदत वाढ देण्यात आली आहे.

मुंबईतील गिरणी कामगारांना म्हाडा घरांची पात्रता निश्चितिसाठी मुदतवाढ
author img

By

Published : Aug 2, 2019, 2:11 PM IST

मुंबई- येथील म्हाडातर्फे गिरणीकामगारासाठी बांधण्यात आलेल्या पनवेल मधील कोन येथील २४१७ सदनिकांच्या सोडतीतील ३४६ यशस्वी गिरणी कामगार/वारसांना प्रथम सूचना पत्राच्या अनुषंगाने पात्रता निश्चितीकरिता कागदपत्रे सादर करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत अंतिम मुदत वाढ देण्यात आली आहे.

मुंबईतील गिरणी कामगारांना म्हाडा घरांची पात्रता निश्चितिसाठी मुदतवाढ

२ डिसेंबर २०१६ रोजी मुंबई मंडळातर्फे गिरणी कामगारांकरिता या भागातील घरासाठी सोडत जाहीर करण्यात आली होती. २४१७ सदनिकापैकी ३४६ यशस्वी अर्जदारांनी अद्याप पात्रता निश्चिती करीता कागदपत्रे सादर केलेली नाहीत. या अर्जदारांची यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mhada.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अर्जदारांना पात्रता निश्चितीकरिता ३१ ऑगस्ट, २०१९ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली असून त्यांनी कोटक महिंद्रा बँकेच्या हॉलमार्क प्लाझा, कला नगर वांद्रे (पु) मुंबई ५१ या शाखेत बँकेच्या कार्यालयीन दिवशी व वेळेत कागदपत्र सादर करावीत. असे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आले आहे.

तसेच ज्या गिरणी कामगार /वारसांनी विकल्प अर्ज -२ भरून दिले आहेत. परंतु, त्यांच्यापैकी ज्या गिरण्यांच्या जागेवर घरे उपलब्ध होणार नाहीत. अशा अर्जदारांकडून विकल्प अर्ज-१ भरून देणे आवश्यक असल्याने त्यांना देखील पुन्हा विकल्प अर्ज आणि आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्याची संधी मंडळातर्फे यादरम्यान देण्यात आली आहे. तथापी विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास सोडतीत लागलेला अर्ज रद्द करून प्रतीक्षा यादीवरील गिरणी कामगार /वारस याना संधी देण्यात येईल. असे मंडळातर्फे संबंधित अर्जदारांना सूचित केले आहे.

तसेच सदनिकांच्या वितरणासाठी किंवा याबाबतच्या कोणत्याही कामासाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत. अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीशी सदनिकेबाबत कोणताही परस्पर व्यवहार केल्यास त्याला मुंबई मंडळ /म्हाडा/ एमएमआरडीए जबाबदार राहणार नाही असेही म्हाडातर्फे सांगण्यात आले आहे.

Intro:मुंबई

म्हाडातर्फे गिरनिकामगारासाठी बांधण्यात आलेल्या
पनवेल येथील मौजे कोन येथील २४१७ सदनिकांच्या सोडतीतील ३४६ यशस्वी गिरणी कामगार/वारसांना प्रथम सूचना पत्राच्या अनुषंगाने पात्रता निश्चितीकरिता कागदपत्रे सादर करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत अंतिम मुदत वाढ देण्यात आली आहे. Body:२ डिसेंबर २०१६ रोजी मुंबई मंडळातर्फे गिरणी कामगारांकरिता या भागातील घरासाठी सोडत जाहीर करण्यात आली होती. २४१७ सदनिकापैकी ३४६ यशस्वी अर्जदारांनी अद्यापि पात्रता निश्चिती करीता कागदपत्रे सादर केलेली नाहीत. या अर्जदारांची यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळ
https://mhada.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अर्जदारांना पात्रता निश्चितीकरिता ३१ ऑगस्ट, २०१९ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली असून त्यांनी कोटक महिंद्रा बँकेच्या हॉलमार्क प्लाझा , कला नगर वांद्रे (पु) मुंबई ५१ या शाखेत बँकेच्या कार्यालयीन दिवशी व वेळेत कागदपत्र सादर करावीत, असे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आले आहे.

तसेच ज्या गिरणी कामगार /वारसांनी विकल्प अर्ज -२ भरून दिले आहेत परंतु त्यांचेपैकी ज्या गिरण्यांच्या जागेवर घरे उपलब्ध होणार नाहीत अशा अर्जदारांकडून विकल्प अर्ज-१ भरून देणे आवश्यक असल्याने त्यांना देखील पुन्हा विकल्प अर्ज आणि आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्याची संधी मंडळातर्फे यादरम्यान देण्यात आली आहे. तथापी विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास सोडतीत लागलेला अर्ज रद्द करून प्रतीक्षा यादीवरील गिरणी कामगार /वारस याना संधी देण्यात येईल , असे मंडळातर्फे संबंधित अर्जदारांना सूचित केले आहे.

तसेच सदनिकांच्या वितरणासाठी किंवा याबाबतच्या कोणत्याही कामासाठी प्रतिनिधी म्हणून नेमलेले नाही . अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीशी सदनिकेबाबत कोणताही परस्पर व्यवहार केल्यास त्याला मुंबई मंडळ /म्हाडा/ एमएमआरडीए जबाबदार राहणार नाही असेही म्हाडातर्फे सांगण्यात आले आहे.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.