ETV Bharat / state

दावोस परिषदेसाठी 34 कोटींची तरतूद, करोडोंमध्ये गुंतवणूकीचा मुख्यमंत्र्यांचा दावा - 34 कोटींची तरतूद

CM Eknath Shinde Davos Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दावोस दौऱ्यावर दौऱ्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 34 कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद केली आहे. दावोस दौऱ्याचे खर्चाचे नियोजन झाले आहे. प्रोटोकॉल प्रमाणे हे नियोजन केले जातात अशी माहिती, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा यांनी दिली. मात्र अधिक काही बोलण्यास त्यांनी नकार दिला.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2024, 7:33 PM IST

मुंबई CM Eknath Shinde Davos Tour : दावोस येथे होत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत यंदाही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं सहभाग घेतला जाणार आहे. गेल्या वर्षीही राज्य सरकारच्या वतीनं या परिषदेत सहभाग घेतला गेला होता आणि कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आल्याचा दावा, मुख्यमंत्र्यांनी केला होता. यावर्षी या दौऱ्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीनं 34 कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.

दावोसमध्ये काय आहे नियोजन? : दावोसमध्ये या आर्थिक परिषदेसाठी सहभागी होणाऱ्या शिष्टमंडळातील सदस्यांचा व्हीजा, विमान प्रवास, स्थानिक प्रवास खर्च, राहण्याची व्यवस्था आणि सुरक्षेच्या उपायोजनांसाठी मिळून 18 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 15 ते 19 जानेवारी दरम्यान येथे होत असलेल्या आर्थिक परिषदेसाठी राज्य सरकारकडून सहभागी होणाऱ्या शिष्टमंडळाचा खर्च महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून उचलण्यात येतो. परिषदेसाठी भोजन व्यवस्था, सजावट इत्यादी बाबीही यात अंतर्भूत आहेत. या परिषदेत राज्य सरकारच्या वतीनं दालन कक्ष आरक्षित करण्यासाठी यापूर्वीच चार कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. तर भोजन व्यवस्था, सजावट आणि दालनाच्या उभारणीसाठी सुमारे 16 कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. तर खानपानासाठी सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

18 कोटींचा काय असणार खर्च? : दावोस आर्थिक परिषदेसाठी जाणाऱ्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या शिष्टमंडळामध्ये असणाऱ्या सदस्यांचा विजा आणि विमान प्रवास त्यांच्या भोजनाची, निवासाची व्यवस्था त्यांच्यासाठी असलेली सुरक्षा व्यवस्था, भेटवस्तू तसेच दैनिक भत्ता आणि विमा यांचा यात समावेश आहे. यासोबतच परिषदेसाठी लागणाऱ्या प्रसिद्धी साहित्य, कुरिअर आणि फिल्म तयार करण्याचा खर्च या संपूर्ण व्यवस्थेसाठी 18 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असल्याची माहिती, एमआयडीसीतील अधिकाऱ्यांनी दिली. या 18 कोटी रुपयांच्या नियोजनात चार्टर्ड विमानाचा खर्चही अंतर्भूत करण्यात आला आहे. यासंदर्भात एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी केवळ हा प्रोटोकॉल प्रमाणे नियोजित दौरा आणि खर्चाची तरतूद असते इतकंच सांगितलं.

काय होता गतवर्षीचा खर्च? : गेल्या वर्षी राज्य सरकारच्या वतीनं दावोस येथे आर्थिक परिषदेमध्ये सहभाग घेताना राज्य सरकारच्या वतीनं स्टेट डीलर देण्यात आले होते. या डीलरसाठी 100 व्यक्ती आमंत्रित असताना दीडशे व्यक्ती उपस्थित राहिल्याने, पन्नास लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च झाला होता. गतवर्षी 16 कोटी 30 लाख रुपये मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळाच्या प्रवासासाठी, सात कोटी सत्तावीस लाख रुपये स्टेट डीलरसाठी, सुमारे दोन कोटी रुपये भेटवस्तूंसाठी, सहा लाख रुपये सुरक्षेसाठी, साठ लाख रुपये स्थानिक वृत्तपत्रांमधील प्रसिद्धीसाठी, एक कोटी 62 लाख रुपये आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीसाठी, दोन कोटी रुपये चार्ट विमानासीठी, अतिरिक्त खर्चासाठी एक कोटी 89 लाख रुपये असा, एकूण 32 कोटी 31 लाख रुपये खर्च करण्यात आला होता.

किती येणार गुंतवणूक? : दावोस जागतिक आर्थिक परिषदेमधून गतवर्षी एक लाख चाळीस कोटी रुपये औद्योगिक गुंतवणुकीच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. त्यापैकी 85 टक्के उद्योग सुरू असल्याचा दावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिंदे यांचे कुटुंबीय तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी जाणार आहेत. त्यामुळं ही सहल आहे की, उद्योग दौरा असा सवाल शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. यावर्षी सुद्धा एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात येईल असा दावा, सरकारच्या वतीनं करण्यात येत आहे.

हेही वाचा -

  1. Uday Samant In Davos : दावोसमध्ये 45 हजार कोटींचे सामंजस्य करार; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा
  2. Deepak Kesarkar on Davos Tour : चार्टड फ्लाईटने जाण्यात गैर काय- दीपक केसरकर
  3. Cm Eknath Shinde on Davos trip : दावोसच्या दौऱ्यात गुंतवणुकीचे 1 लाख 40 हजार कोटींचे करार होणार- एकनाथ शिंदे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.