मुंबई - राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यापीठांच्या परिक्षांसंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्यातील १३ विद्यापीठांच्या वर्षाच्या परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भातला निर्णय जाहीर केला. याकरिता सर्व विद्यापीठांनी यंत्रणा सज्ज करावी, असे आदेशही सामंत यांनी दिले. हा निर्णय सर्वानुमते निर्णय घेण्यात आला असून या परीक्षा घेताना जर विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणी निर्माण होणार असतील, तर त्याची पूर्तता करण्याच्या सूचना आणि विनंती मी सर्व विद्यापिठांच्या कुलगुरुंना केली असल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच या परीक्षांपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता सर्व विद्यापीठांनी घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील विद्यापीठांच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार; उदय सामंत यांची घोषणा
राज्यातील १३ विद्यापीठांच्या वर्षाच्या परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भातला निर्णय जाहीर केला. याकरिता सर्व विद्यापीठांनी यंत्रणा सज्ज करावी, असे आदेशही सामंत यांनी दिले.