ETV Bharat / state

Best Bakery Violence Case : बेस्ट बेकरी हिंसाचार प्रकरण; तिन्ही साक्षीदारांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तपासणी

बेस्ट बेकरी हिंसाचार प्रकरणातील ( Best Bakery Violence Case ) तीन साक्षीदारांचा जबाब व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात नोंदवण्यात आला आहे.

Best Bakery Violence Case
बेस्ट बेकरी हिंसाचार प्रकरण
author img

By

Published : Nov 3, 2022, 7:47 AM IST

मुंबई : गुजरातमधील वडोदरा येथे गोध्रा हत्याकांडानंतर 2002 मध्ये घडलेल्या बेस्ट बेकरी हिंसाचार प्रकरणातील ( Best Bakery Violence Case ) तीन साक्षीदारांचा जबाब आज व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात नोंदवण्यात आला आहे. मागील सुनावणी दरम्यान साक्षीदारांना हजर न करू शकलेल्या गुजरात पोलिसांना न्यायालयाने फटकारल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने साक्षीदारांचा जबाब ( Answer of witnesses in online mode) नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

वीस वर्षानंतर या प्रकरणातील साक्षीदारांचा जबाब : बेस्ट बेकरी हिंसाचार प्रकरणांमध्ये नोंदवण्यात आलेल्या तिन्ही सांख्यदारांच्या जबाबानंतर पुढील सोनवणे 7 नोव्हेंबर रोजी या प्रकरणातील तपास अधिकारी यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. वीस वर्षानंतर या प्रकरणातील साक्षीदारांचा जबाब मुंबई सत्र न्यायालयातील ट्रायल कोर्टात नोंदवणे सुरू आहे. साक्षीदारांना कोर्टामध्ये साक्ष देण्याकरिता हजर न करता आलेल्या गुजरात पोलिसांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने फटकारले आहे. पोलिसांना साक्षीदारांना हजर करण्याची साधी गोष्ट जमत का नाही ? असा प्रश्न न्यायालयाने विचारला आहे. तसेच या प्रकरणात पुढील सुनावणी दरम्यान साक्षीदारांना हजर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिली होते. त्यानुसार गुजरात पोलिसांनी साक्षीदारांना व्हिडिओ न्यायालयासमोर हजर केले होते.

न्यायालयाने घेतली कठोर भूमिका : 1 मार्च 2002 रोजी वडोदरा येथील हनुमान टेकरी येथील बेस्ट बेकरी वरील हल्ल्यादरम्यान झालेल्या हिंसाचारात 14 जणांचा मृत्यू झाला होता. मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणात साक्षीदारांना हजर न करणाऱ्या गुजरात पोलिसांना चांगले धारेवर धरले होते. गुजरात पोलिसांना साक्षीदारांना हजर करण्याची साधी गोष्ट जमत का नाही? आता याबाबत आम्हाला विचार करावा लागेल. आणखी चालढकल चालणार नाही अशी कठोर भूमिका न्यायालयाने घेतली.

दोन्ही साक्षीदारांविरुद्ध समन्स जारी : या खटल्याची मुंबई सत्र न्यायालयात विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यापुढे सुनावणी सुरू आहे. सुनावणीवेळी सरकारी पक्षाने दोन साक्षीदार हजर करण्यात गुजरात पोलिसांनी यश आले नसल्याचे सांगितले. पोलिसांनी दोन्ही साक्षीदारांविरुद्ध समन्स जारी केले असून त्यांना मुंबईत आणण्याच्या प्रवास खर्चासाठी पैसेही दिले आहेत. मात्र साक्षीदार हजर राहू शकले नाहीत असे सरकारी वकिलांनी सांगितले.

2010 मध्ये राजस्थान केली होती पोलिसांनी सोळंकीला अटक : यावेळी त्यांनी साक्षीदारांना हजर करण्यासाठी आणखी वेळ मागून घेतला. त्यावर न्यायाधीशांनी पोलिसांच्या अपयशावर नाराजी व्यक्त करीत आम्हीच आता तिथल्या स्थानिक न्यायालयाशी पत्रव्यवहार करून साक्षीदारांना हजर राहायला लावतो असे न्यायाधीश देशपांडे यांनी नमूद केले. मफत गोहील आणि हर्षद सोळंकी या आरोपींनी ऍड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला आहे. बेस्ट बेकरी हिंसाचार प्रकरणात 2010 मध्ये राजस्थान पोलिसांनी सोळंकीला अटक केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.