ETV Bharat / state

HSC Exam 2023: यंदाच्या बारावीच्या परीक्षेत हायटेक कॉपीला लागणार ब्रेक; दारावरच गॅजेट आणि उपकरण केले जाणार चेक - हायटेक कॉपी

10 वी व 12 वी शिक्षण मंडळातर्फे बारावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली. विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयातून परीक्षेची तयारी रविवारपासून सुरू होती. कस्टडीत प्रश्नपत्रिकेवर पोलिसांची नजर ठेवली होती. शिक्षण मंडळाने परीक्षेची सर्व तयारी पूर्ण केली होती. मुंबई विभागीय पातळीवर चार जिल्हे मिळून तीन लाख 40 हजारपेक्षा अधिक विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसलेले आहे. यंदा कॉपीला आळा बसवण्यासाठी हायटेक कॉपी करणाऱ्यांना सुद्धा ब्रेक लावण्याचे काम परीक्षा मंडळांनी मनावर घेतलेले आहे. त्यामुळे यंदा अशा प्रकाराला आळा असेल, अशी शक्यता परीक्षा मंडळाने वर्तवली आहे.

HSC Exam 2023
बारावीची परीक्षा २०२३
author img

By

Published : Feb 22, 2023, 7:14 AM IST

मुंबई : यंदाच्या परीक्षेमध्ये पहिल्यांदाच ऐतिहासिक असा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला. तो म्हणजे केंद्र संचालक वर्ग दोनचे जे अधिकारी आहेत. त्यांना देखील जबाबदार धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. याचे कारण विद्यार्थ्याकडे कॉपी सापडली, तर त्याला जबाबदार केंद्र संचालक यांना धरले जाईल. त्यामुळे केवळ विद्यार्थी आता डी बार होणार नाही, तर केंद्र संचालक यांना देखील कारवाईला सामोरे जावे लागेल.

मुलांना लिखाणाची सवय : महाराष्ट्र शासनाने यंदा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षेच्या आधी पूर्वीपासून जे दहा मिनिटे देण्याचे धोरण होते. ते रद्द केले. त्यामुळे पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याकडून हे दहा मिनिटे आधी किंवा नंतर शेवटाला दिले जावे, अशी मागणी केली होती. त्याचे कारण मुलांना लिखाणाची सवय ही पूर्वीच्या परंपरागत धोरणानुसार असल्यामुळे प्रश्नपत्रिका हातात मिळाल्यावर तिचे नियोजन करणे. त्यातून कोणते संभाव्य प्रश्न आपल्याला येतात ते सोडवणूक करणे. त्यानंतर ज्या प्रश्नाविषयी प्रथम उत्तर आपल्याला येतात ते सोडवणे, याचे नियोजन करण्यासाठी दहा मिनिटे प्रत्येकाला लागतात.

परीक्षा मंडळाचा निर्णय : यावर्षीपासून आता परीक्षा संपल्यानंतरचे दहा मिनिटे प्रत्येक विद्यार्थ्याला दिले जाणार आहे. याचा अर्थ सकाळी साडेदहा वाजता प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षा हॉलमध्ये यायचे आहे. परंतु अकरा वाजता त्याला हातामध्ये पेपर मिळेल. मात्र दोन वाजता जेव्हा पेपर संपेल, तेव्हा 2 वाजून 10 मिनिटे पर्यंतचे हे ज्यादा दहा मिनिटे त्याला अवलोकन करण्यास निरीक्षण करण्यास मिळतील. या पद्धतीचा परीक्षा मंडळाने निर्णय घेतला. त्यामुळे पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

कठोर उपाययोजना : शासनाचा आणि परीक्षा मंडळाचा हेतू हाच की, कॉपी करणे याला आळा बसला पाहिजे. त्यासाठी कठोरात कठोर उपाययोजना पण या वेळेला केलेली आहे. जसे की, परीक्षा केंद्रापासून शंभर मीटर अंतरापर्यंत कोणतेही नकल परत काढण्याचे दुकान चालू असणार नाही. तसेच यासंदर्भात लाईव्ह लोकेशन देखील ठेवले जाईल. विशेष करून हायटेक कॉपी करण्याचे जे प्रकार आहे, त्याला देखील आळा घालण्याची उपाययोजना केलेली आहे.

हायटेक कॉपीला या वर्षी आळा : हायटेक कॉपी करण्याचे प्रकार जसे, काही मोबाईल त्याचबरोबर ब्लूटूथ कानामध्ये घालणे किंवा स्पीकर कानामध्ये ठेवून बाहेरून कोणीतरी प्रॉम्पटिंग करते. त्या पद्धतीने उत्तर लिहिणारा कानामध्ये छोटासा स्पीकर माध्यमातून ऐकत ऐकत पेपर लिहितो. किंवा आपल्या शरीराच्या आणि कपड्यांच्या आतमध्ये विविध प्रकारे कॉपी लपवण्याचा प्रयत्न करतो. या परीक्षा मंडळाने हायटेक कॉपीला रोखण्यासाठी महत्त्वाची उपाययोजना केली आहे.

मुंबई परीक्षा मंडळ विभागाचे अध्यक्ष यांची भूमिका : यामध्ये मुंबई विभागाचे परिक्षा मंडळ अध्यक्ष नितीन उपासनी यांनी सांगितले की, कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षेच्या अर्धा तास आधी प्रवेश दिला जाणार आहे. तसेच त्याची संपूर्ण झडती घेतली जाणार आहे. आणि त्यात मध्ये अँड्रॉइड फोन, साधा मोबाईल, टॅब कुठलेही गॅझेट किंवा असे इलेक्ट्रॉनिक उपकरण त्याला घेऊन जाऊ दिले जाणार नाही. ते त्याच वेळेला काढून घेतले जाईल. तसेच प्रत्येक केंद्र संचालक आणि जेव्हा कस्टडीमध्ये प्रश्नपत्रिका असतात, त्याचे मोबाईलचे जीपीएस लोकेशन आम्ही प्रत्येकाला चालू ठेवायला सांगितले. त्यामुळे जीपीएस लोकेशन सातत्याने ट्रॅक केले जाणार आहे. त्यामुळे हायटेक कॉपी करण्याला आळा बसणार आहे.

संपूर्ण झडती घेतली जाईल : तसेच पुढे त्यांनी अधोरेखित केले, जो कोणी परीक्षार्थी कानामध्ये किंवा केसांमध्ये किंवा टोपीमध्ये किंवा आपल्या पेपर ज्याला टेकवला जातो, त्या पॅडमध्ये किंवा कपड्यांमध्ये किंवा आपल्या चप्पल, सॅंडल, बूट यामध्ये स्पीकर किंवा इतर गॅझेट लपवू शकेल. याची शक्यता गृहीत धरून या हायटेक कॉपी करण्याला आळा बसवण्याचे काम यंदा अत्यंत चोखपणे केले गेलेले आहे. जसे की प्रवेशद्वारावरच त्यांना रोखले जाईल. त्यांच्या संपूर्ण कपड्यांची झडती घेतली जाईल. त्याला त्या तपासणी दरवाज्यातून पार व्हावे लागेल. त्या दरवाजामध्ये डिटेक्टर लावले जाईल, त्यामुळे त्यांनी अशी कोणती गॅजेट किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण कानामध्ये किंवा कुठे ठेवले असेल ते पटकन सापडू शकेल. त्यामुळे यंदा असे प्रकार होण्याची शक्यता नाही. याची खबरदारी आम्ही घेतली असल्याचे मुंबई विभागाचे परिक्षा मंडळ अध्यक्ष नितीन उपासनी यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना विशद केले.

हेही वाचा : Sushma Andhare : फडणवीसांची राऊतांवर टीका; सुषमा अंधारे म्हणाल्या, ते विद्वान व्यक्ती...

प्रतिक्रिया देताना नितीन उपासनी मुंबई विभागाचे परीक्षा मंडळ अध्यक्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.