हिमाचल प्रदेशच्या कुल्लूजवळ ५०० फूट दरीत बस कोसळली, १५ मृतदेह सापडले
कुल्लू - हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील बंजारजवळ एक खासगी बस ५०० फूट दरीत कोसळली. बंजारपासून एक किलोमीटरवरील भियोठ वळणावर हा अपघात घडला. १५ मृतदेह सापडले आहेत. तर, २५ जण जखमी झाले आहेत. बसमध्ये जवळपास ४० ते ५० जण असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाचा सविस्तर
यकृत, किडनी घ्या, पण खते बियाणे द्या; शेतकऱ्याचा टाहो, पडसाद विधानपरिषदेत
हिंगोली - दुष्काळामुळे जिल्ह्यातील ताकतोडा येथील एका शेतकऱ्यावर आलेल्या परिस्थितीची दखल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी घेतली आहे. ताकतोडा येथील शेतकरी नामदेव पतंगे यांनी मुख्यमंत्री आणि तहसीलदारांना पत्र लिहून यकृत, किडनी घ्या, पण मला खते बी-बियाणे द्या, अशी मागणी केली होती. या मुद्द्यावरुन धनंजय मुंडे आज सभागृहात आक्रमक झाले. वाचा सविस्तर
दोन दोन उत्तरे देताना तुम्ही झोपा काढता का? विधानसभेत भुजबळांनी सदाभाऊंना सुनावले
मुंबई - विधानसभेत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. नाशिकमधील टर्मिनल मार्केटच्या मुद्यावरुन दोघांमध्ये शाब्दीक चकमक झाली. मंत्र्यांच्या पहिल्या उत्तरात आणि आत्ताच्या उत्तरात तफावत असल्यामुळे लक्षवेधी राखून ठेवण्याचा निर्णय विधानसभा उपाध्यक्ष विजय औटींनी घेतला. वाचा सविस्तर
नेवासा शहरात भरदिवसा बँकेतून अडीच लाखांची रक्कम पळवली; घटना सीसीटीव्हीत कैद
अहमदनगर - नेवासा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भर दिवसा अडीच लाखांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लहान मुलाच्या मदतीने पळवली. ही घटना आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली असून हा प्रकार बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर
पुणे जिल्ह्यात भाजीपाला महागला; तर चांगल्या भावामुळे शेतकरी सुखावला
पुणे - दुष्काळी परिस्थितीचा सामना करणारा बळीराजा मेटाकुटीला आला आहे. त्यातच मान्सुनही लांबला आहे. ज्यांच्याकडे थोडेफार पाणी उपलब्ध आहे त्यावर काटकसरत करत भाजीपाला, तरकारी अशी पिके शेतकरी घेत आहेत. मात्र, कमी उत्पादनामुळे शेतकऱ्यांच्या मालास मिळणारा बाजारभाव तेजीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. वाचा सविस्तर