मुंबई: शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या वक्तव्याचा आदित्य ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. मला वाटतं की काही लोकांना किंमत देण्यात अर्थ नाही; कारण की तिकडे देखील एक, दीड वर्षे झाले आहेत. तिकडे त्यांना कोणी किंमत देत नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी शिरसाट यांचे नाव न घेता लगावला आहे. शिरसाट यांची किंमत काही असली तरी हे सडके विचार आहेत. जनता यांना उत्तर देईल. ज्यांना जेवढी किंमत द्यायची तेवढीच देऊ. त्यांना त्यांच्या पक्षात कोणी विचारत नाही. मंत्रिमंडळ विस्तार झाले; पण यांना काही किंमत दिली नाही असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.
अधिवेशनाला सुट्टी? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये असल्याने सुट्टी जाहीर झाली. आम्ही जेव्हा सभागृहात प्रश्न विचारतो तेव्हा उत्तर देणाऱ्या मंत्र्यांचा अभ्यास कच्चा असतो. सरकार उत्तर देऊ शकत नाही. विचारलेल्या प्रश्नावर उत्तर कोण देणार हे आम्हाला वाटत. सरकारचे मंत्री अभ्यास करत नाहीत. तेव्हा वाईट वाटतं. एक मंत्री तर महिलांवर चिडले, हे योग्य नाही. महिलांनी प्रश्न विचारायचे नाहीत का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे.
विरोधी पक्षनेता महत्वाचा नाही: विरोधी पक्षनेता एक विषय आहे. मात्र, सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षातील आमदारांना उत्तर दिले जात नाही. घटनाबाह्य सरकार जरी बसले असेल तर विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देणे महत्त्वाचे आहे. सत्तापक्ष अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात तरी प्रश्नाला नीट उत्तर देतील. विरोधी पक्ष नेता आमच्यासाठी फार महत्वाचा नाही. आम्ही सगळे आघाडी म्हणून सोबत आहोत. जनतेचे प्रश्न आहे. त्यावर सरकारने किमान उत्तर दिले नाही. यांना काही लोकांकडे लक्ष द्यायचे नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
BRS आणि VBA युती बाबत: बहुजन वंचित आघाडी ही उद्धव ठाकरे गटासोबत असून, वंचितकडून बीआरएस पक्षासाठी दरवाजे खुले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नेमका संभ्रम काय आहे या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, सध्या 'आयपीएल' पेक्षा कामावर फोकस करावे, असे मला वाटते. मला कोणतंही राजकीय बोलायचं नाही. आता लगेच काही राजकीय बोलणार नाही. निवडणुका आल्या की, चित्र स्पष्ट होईल. आम्ही जनतेसोबत आहोत आणि जनतेसोबतच राहणार, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.
'बीएमसी'मध्ये पहिल्यांदा अतिक्रमण: पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या 'बीएमसी'त ऑफिस वरून राजकारण तापत असते. मुंबई शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून देखील आदित्य ठाकरे यांनी सरकारला लक्ष केले आहे. उपनगरात चांगले रस्ते खराब झालेत. हे रस्ते मुद्दाम खराब केले का? G-२०साठी लावलेल्या लाईट बंद पडल्या आहेत. मी याआधी रस्त्यावर अतिक्रमण पाहिलं पण 'बीएमसी'मध्ये अतिक्रमण पहिल्यांदाच पाहिले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: