ETV Bharat / state

आज...आत्ता...सकाळी ९ वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या - maharashtra

जम्मू- काश्मीरमधील बडगाम येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले,तर उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे 'जय श्री राम' म्हणण्यास नकार दिल्याने अज्ञात व्यक्तींनी 16 वर्षीय मुस्लीम मुलाला मारहाण केल्याची घटना घडली. आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी यजमान इंग्लंडला भारताविरुद्ध झुंजावे लागणार आहे, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याचे नियम महापालिकेच्या शाळेत पाळले जात नसल्याच्या निषेधार्थ शनिवारी दुपारच्या सुमारास केडीएमसी मुख्यालयावर विद्यार्थ्यांसह पालकांनी चड्डी-बनियन मोर्चा काढला, कोंढवा भिंत दुर्घटनेतील मजूरांच्या कुंटुबीयांना बिहार सरकारने प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

आज...आत्ता...रविवार ३० जून २०१९ सकाळी ९ वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या
author img

By

Published : Jun 30, 2019, 10:00 AM IST

बडगाममध्ये चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा; ऑपरेशन सुरू

श्रीनगर - जम्मू- काश्मीरमधील बडगाम येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. गेल्या २४ तासांतील ही दुसरी चकमक आहे. अद्यापही ऑपरेशन सुरूच आहे. वाचा सविस्तर...

धक्‍कादायक! 'जय श्रीराम' म्हणण्यास नकार दिल्याने अज्ञात व्यक्तींकडून अल्पवयीन मुलास मारहाण

कानपूर - उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे 'जय श्री राम' म्हणण्यास नकार दिल्याने अज्ञात व्यक्तींनी 16 वर्षीय मुस्लीम मुलाला मारहाण केल्याची घटना घडली. पोलिसांच्या अहवालानुसार, ही घटना शुक्रवारी घडली आहे. मोहम्मद ताज, असे त्या तरुणाचे नाव आहे. वाचा सविस्तर...

CRICKET WC : आज रंगणार 'भगवं विरुद्ध निळं' युद्ध; उपांत्य फेरी गाठण्यासाठी इंग्लंडला विजय आवश्यक

बर्मिंगहॅम - आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज 'भगवं - निळं' युद्ध रंगणार आहे. या स्पर्धेत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी यजमान इंग्लंडला भारताविरुद्ध झुंजावे लागणार आहे. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर हा सामना रंगणार असून तो दुपारी ३ वाजता सुरू होईल. आयसीसीच्या नियमानुसार विश्वकरंडक स्पर्धेत एका सामन्यात दोन्ही संघांची जर्सी एकाच रंगाची असल्यास, दोन्ही संघापैकी एका संघाला आपल्या जर्सीच्या रंगात बदल करावा लागतो. त्या नियमानुसार भारतीय संघ इंग्लडविरूद्ध खेळताना भगव्या रंगाच्या जर्सीत दिसणार आहे. वाचा सविस्तर..

यामुळे केडीएमसी मुख्यालयावर धडकला शालेय विद्यार्थ्यांचा चड्डी-बनियन मोर्चा

पुणे - बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार दुर्लब वंचित घटकातील विद्यार्थ्यांना पहिलीच्या प्रवेशासाठी 25 टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहेत. तसेच शैक्षणिक साहित्य मोफत पुरवले जाणे बंधनकारक आहे. मात्र, हे नियम महापालिकेच्या शाळेत पाळले जात नसल्याच्या निषेधार्थ शनिवारी दुपारच्या सुमारास केडीएमसी मुख्यालयावर विद्यार्थ्यांसह पालकांनी चड्डी-बनियन मोर्चा काढला होता. वाचा सविस्तर...

पुणे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबीयांना बिहार सरकारकडून प्रत्येकी २ लाखांची मदत

पुणे - कोंढवा भिंत दुर्घटनेतील मजूरांच्या कुंटुबीयांना बिहार सरकारने प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. इमारतीची संरक्षक भिंत पत्र्याच्या खोल्यांवर कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या अपघातात भिंतीच्या मलब्याखाली दबून १५ मजुरांचा मृत्यू झाला आहे.वाचा सविस्तर...

बातमी, सर्वांच्या आधी

www.etvbharat.com/marathi/maharashtra

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.