कर्तारपूर कॉरिडॉरच्या चर्चेसाठी भारताकडून पाकिस्तानला प्रस्ताव
नवी दिल्ली - कर्तारपूर कॉरिडॉरच्या पुढच्या टप्प्यातील चर्चेसाठी भारताकडून पाकिस्तानला येत्या 11-14 जुलै या दिवशी बैठक घेण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. कर्तारपूर कॉरिडॉरची आधारभूत संरचना , इतर तांत्रिक अडचणींचे निराकरण आणि मसुदा करारावार चर्चा करण्यासाठी भारताने हा प्रस्ताव मांडला आहे.वाचा सविस्तर...
'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींचा आणीबाणीवरून काँग्रेसवर निशाणा
नवी दिल्ली - दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच मन की बात केली. हा कार्यक्रम ४ महिन्यानंतर झाला. २४ फेब्रुवारीला त्यांनी शेवटचा मन की बात कार्यक्रम केला होता.वाचा सविस्तर...
...म्हणूण छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल भरसभेत लागले रडायला
रायपूर - छत्तीसगढचे विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शनिवारी मोहन मारकम यांना प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. यावेळी जनसभेला संबोधीत करताना ते भरसभेत रडायला लागले. त्यांचा रडतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. वाचा सविस्तर...
लातुरात प्लास्टिक बंदी नावालाच; मनपाची मोहीम ४ महिन्यापूरतीच
लातूर - सर्व राज्यभरात २४ जून २०१८ पासून प्लास्टिक बंदी करण्यात आली. मोठा गाजवाजा करत लातूर शहरातही या मोहिमेला सुरुवात झाली होती. मात्र, काळाच्या ओघात या मोहिमेचा मनपाला विसर पडल्याचे दिसून येत आहे. दिव्याखाली अंधार याप्रमाणेच आता मनपाचे अधिकारी-कर्मचारीच प्लास्टिकचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. प्लास्टिक बंदी निर्णयाच्या वर्षपूर्तीनंतर 'ईटीव्ही भारत'ने याचा आढावा घेतला असून याबाबत मनपाची उदासिनता समोर आली आहे. वाचा सविस्तर...
'अल्हाह के रास्ते से भटक गई थी', 'दंगल'गर्लची बॉलिवूडमधून एक्झिट
मुंबई - आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटातून बॉलिवूडला मिळालेला नवा चेहरा म्हणजे जायरा वसीम. तिच्या अभिनयाने तिने पहिल्याच चित्रपटातून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र, तिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. जायराने बॉलिवूडमधुन एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मात्र चांगलाच धक्का बसलाय. वाचा सविस्तर...
बातमी, सर्वांच्या आधी
www.etvbharat.com/marathi/maharashtra