मुंबई - राज्याची राजधानीची लाईफलाईन समजली जाणारी लोकलसेवा आजपासून पुन्हा रुळावर... दिल्लीत पेट्रोल डिझेलच्या दरात सलग नवव्या दिवशी पुन्हा वाढ... वंदे भारत मोहिमे अंतर्गत विदेशातील हजारो भारतीय मुंबईत दाखल.. यासारख्या महत्वाच्या १० बातम्या वाचा एका क्लिकवर...
नवी दिल्ली - कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन अनलॉक झाल्यानंतर इंधनाच्या दरात रोज वाढ होताना दिसत आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत आज पेट्रोल 76.26 रुपये प्रति लिटर तर डिझेल 74. 62 रुपये प्रति लिटर झाले आहे. गेल्या आठवड्यापासून इंधनदरात वाढ होत असून आज आठवड्याच्या सुरुवातीलाच पेट्रोलमध्ये 48 पैसे तर डिझेल दरात प्रति लिटर 59 पैशांनी वाढ झाली आहे.
वाचा सविस्तर - पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, वाचा किती रुपयांनी महागले
मुंबई - गेले अडीच महिने बंद असलेली मुंबईची 'लाईफलाईन', म्हणजेच लोकल आजपासून सुरू होत आहे. मात्र, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच या गाड्या रुळावर धावणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवार 15 जून पासून मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर लोकल सुरू करण्याला रेल्वे बोर्डाने रविवारी रात्री उशीरा मंजुरी दिली.
वाचा सविस्तर - अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आजपासून मुंबईची 'लाईफलाईन' रुळावर..
हैदराबाद : रविवारी देशात एका दिवसातील सर्वाधिक म्हणजेच, ११,९२९ कोरोना रुग्ण आढळून आले, त्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या ३,२०,९२२वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर पाहूया वेगवेगळ्या राज्यांमधील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी...
वाचा सविस्तर - देशभरातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर..
मुंबई - वंदेभारत अभियानांतर्गत 72 विमानांमधून तब्बल 11 हजार 666 प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. दाखल झालेल्या प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या 4 हजार 313 आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 3 हजार 729 इतकी आहे. तर इतर राज्यातील प्रवाशांची संख्या 3 हजार 624 इतकी आहे.
वाचा सविस्तर - वंदेभारत अभियानांतर्गत 11 हजाराहून अधिक प्रवासी मुंबईत दाखल
मुंबई - राज्यात रविवारी कोरोनातून बरे झाल्यामुळे १६३२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ९७८ झाली इतकी आहे. राज्यात रविवारी एका दिवसात कोरोनाच्या ३३९० नवीन रुग्णांचे निदान झाले. तर सध्या राज्यात ५३ हजार १७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
वाचा सविस्तर - Coronavirus: राज्यात कोरोनावर मात केलेल्यांचा आकडा ५० हजारांवर, रविवारी ३,३९० नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर
वसमत (जि. हिंगोली) - अनेकदा दवाखाने, औषधोपचार करूनही विवाहितेच्या पोटात गर्भ टिकत नसल्याने पतीने तिचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार घडला आहे. ही धक्कादायक घटना वसमत तालुक्यातील सोना येथे 10 जून रोजी घडली होती. याप्रकरणी 14 जून रोजी हट्टा पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
वाचा सविस्तर -धक्कादायक! पोटात गर्भ टिकत नसल्याने पतीने केली पत्नीची हत्या..
शिर्डी (अहमदनगर)- शिर्डी बसस्थानकासमोरील शनिवारी सकाळी नगरपंचायतीच्या सार्वजनिक शौचालयात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी २४ तासातच तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पैशाच्या कारणातून हा खून करण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. शंकर उर्फ अण्णा असे मृताचे नाव आहे. तर राजेंद्र गवळी, सुनील जाधव, सुनील कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या तीन संशयित आरोपींची नावे आहेत.
वाचा सविस्तर - किरकोळ पैशासाठी शिर्डीत एकाची निर्घृण हत्या, २४ तासात ३ आरोपी गजाआड
नवी दिल्ली - दिल्लीत गंभीर बनलेल्या कोरोना समस्येवर चर्चा करण्यासाठी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. आज (सोमवारी) सकाळी 11 वाजता केंद्रीय गृहमंत्रालयात बैठक होणार आहे. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, आप आणि बहुजन समाजवादी पक्षाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.
वाचा सविस्तर - दिल्लीत कोरोना स्थिती गंभीर; अमित शाहांनी बोलवली सर्वपक्षीय बैठक
बीड - सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन येणार आहे, त्यामुळे कोणीही पायी चालत वारी करणे, अन्नत्याग-उपवास, असे करुन स्वतःला त्रास किंवा इजा करणारे प्रयत्न करु नयेत, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे केले. आपल्यावर प्रेम करणाऱ्यांना असा त्रास झाल्यास मला कसे काय बरे वाटेल ?, असा सवालही त्यांनी चाहते कार्यकर्त्यांना केला.
वाचा सविस्तर - मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या चाहत्यांना केले 'हे' आवाहन
कोलकाता - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले. 'पवित्र रिश्ता' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सुशांतने चित्रपट क्षेत्रातही नाव कमावले. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या बायोपिकमध्ये सुशांतने प्रचंड मेहनत घेतली असल्याची प्रतिक्रिया धोनीचे बालपणीचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांनी दिली.
वाचा सविस्तर -''हेलिकॉप्टर शॉटसाठी सुशांत माझ्याकडे आला होता''