ETV Bharat / state

आज..आत्ता..सायंकाळी ७ वाजेपर्यंत महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर - charge on nana patole

३० मे रोजी सायंकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवन येथे नरेंद्र मोदी १७ व्या लोकसभेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या मंत्रिमडळात शिवसेनेला चार मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेससोबतची राजकीय गुलामी संपली, यापुढील चर्चा केवळ समसमान पातळीवरच, प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य.. जितेंद्र आव्हाड म्हणाले दाभोळकर हत्याप्रकरणी अटकेत असलेले पुनाळेकर पुण्याचे खासदार होतील..सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नाना पटोलेंसह काँग्रेसच्या ४ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली
author img

By

Published : May 26, 2019, 6:59 PM IST

'मै नरेंद्र दामोदरदास मोदी, पंतप्रधानपद की शपथ लेता हूं...' ३० तारखेला राष्ट्रपती भवनात होणार शपथविधी सोहळा

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी झाल्यानंतर एनडीएकडून सरकार स्थापनेला वेग आला आहे. काल (शनिवारी) नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला होता. त्यानुसार, ३० मे रोजी सायंकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवन येथे नरेंद्र मोदी १७ व्या लोकसभेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत काही नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सविस्तर वाचा

शिवसेनेला मिळणार ४ मंत्रीपदे ? 'या' नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा

मुंबई - एनडीएच्या नेतेपदी एकमताने नरेंद्र मोदींची निवड झाली आहे. ३० मे रोजी नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी काही मंत्र्याचाही शपथविधी होणार आहे. शिवसेनेकडूनही मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु असून, सेनेला ४ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये संजय राऊत, अनिल देसाई, भावना गवळी आणि राहुल शेवाळे यांची नावे जोरदार चर्चेत आहेत. सविस्तर वाचा

काँग्रेससोबतची राजकीय गुलामी संपली; यापुढील चर्चा केवळ समसमान पातळीवरच - प्रकाश आंबेडकर

मुंबई - लोकसभा निवडणुकीत औरंगाबादचा अपवाद वगळता राज्यात वंचित बहुजन आघाडीचा दारूण पराभव झाला. तर आघाडीलाही त्यांचा मोठा फटका बसला. आघाडीला तब्बल ८ जागांवर पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने आता विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. सविस्तर वाचा

...तर दाभोळकर हत्याप्रकरणी अटकेत असलेले पुनाळेकर पुण्याचे खासदार होतील - जितेंद्र आव्हाड

ठाणे - अॅड. संजीव पुनाळेकर यांना करण्यात आलेली अटक ही निव्वळ धुळफेक असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. उच्च न्यायालयाने 'दणका' देण्याअगोदर आपण काहीतरी करायला हवे, या दृष्टिकोनातून पुनाळेकर यांना अटक करण्यात आली. तसेच ज्या पध्दतीने भोपाळमधून प्रज्ञा ठाकूर या निवडणुकीत उभ्या राहिल्या आणि खासदारही झाल्या. त्या पद्धतीने पाच वर्षांनंतर पुनाळेकर देखील पुण्याचे उमेदवार असतील, असे भाकितही आव्हाड यांनी वर्तवले आहे. सविस्तर वाचा

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नाना पटोलेंसह काँग्रेसच्या ४ नेत्यांवर गुन्हा दाखल

नागपूर - सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा कारणावरुन काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या ४ नेत्यांविरुद्ध नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा

Intro:Body:

आज.. आत्ता.. सायंकाळी ७ वाजेपर्यंत महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.