बारावीचा निकाल आज जाहीर होणार, दुपारी १ वाजता दिसणार ऑनलाईन
मुंबई - बारावीच्य परिक्षेचा निकाल आजा जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता हा निकाल राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहायला मिळेल. फेब्रुवारी - मार्च महिन्यात बारावीची परिक्षा घेण्यात आली होती. वाचा सविस्तर...
झारखंडमधील सरायकेलात माओवाद्यांचा हल्ला, आयईडी स्फोट केल्याने अनेक जवान जखमी
रांची - झारखंडमधील सरायकेला खरसावा येथे माओवाद्यांनी सकाळीच पोलिसांवर हल्ला केला. माओवाद्यांनी येथे आयईडी बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटात कोब्राच्या ८ जवानांसह एकूण ११ जवान जखमी झाले. या जवानांना चॉपर हेलिकॉप्टरने रांची येथे उपचारांसाठी पाठवण्यात येत आहे. माओवाद्यांशी अद्याप चकमक सुरू आहे. याच भागात निवडणुका संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माओवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला होता. वाचा सविस्तर...
राही सरनोबतचा 'सुवर्णवेध'; नेमबाजी विश्वकरंडकात पटकावले तिसरे सुवर्णपदक
म्युनिच - जर्मनी येथे सुरू असलेल्या आंतराष्ट्रीय नेमबाजी विश्वकरंडक स्पर्धेत कोल्हापूरच्या राही सरनोबतने भारतासाठी तिसरे सुवर्णपदक कमावले आहे. सोमवारी झालेल्या २५ मीटर पिस्टल प्रकारात राहीने प्रथम क्रमांक पटकावत टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीटही मिळवले आहे. वाचा सविस्तर...
आईच्या प्रियकराने पोटावर लाथ मारल्याने चार वर्षीय बालकाचा मृत्यू; जळगावातील संतापजनक घटना
जळगाव - मद्यधुंद अवस्थेत आईच्या प्रियकराने पोटावर लाथ मारल्याने एका ४ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना सोमवारी जळगाव शहरात घडली. महेश कैलास माळी (वय ४, रा. यशोदानगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. या प्रकरणी संशयित आरोपी कैलास माळी याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आहे. महेशच्या आईने त्याच्या खऱ्या बापाचे नाव बदलून आरोपीचे नाव दिले होते. वाचा सविस्तर...
नाट्यरसिकांसाठी मेजवानी, मुंबईत ३ जूनला रंगणार दर्जेदार नाटकांचा महोत्सव
मुंबई - येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात येत्या ३ जून रोजी ३ दर्जेदार मराठी नाटकांचा महोत्सव रंगणार आहे. मराठी नाटक समूह, प्रशांत दामले फॅन फाउंडेशन यांनी संयुक्तरीत्या या नाट्यमहोत्सवाच आयोजन केले आहे. मराठी नाटकांच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या पुढाकाराने होणाऱ्या प्रायोगिक नाट्यमहोत्सवाच यंदाचं हे दुसरं वर्ष आहे. वाचा सविस्तर...