पुणे - नवले पुलाजवळ इथेनॉलचा टँकर पलटी होऊन अपघात झाला आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 12 जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Big Breaking : नवले पुलाजवळ इथेनॉलचा टँकर पलटी, चौघांचा मृत्यू, 12 जखमी - etv bharat marathi breaking updates
22:19 October 22
पुण्यातील नवले पुलाजवळ इथेनॉलचा टँकर पलटी, चौघांचा मृत्यू
20:18 October 22
शाहरुख खानचा बॉडीगार्ड NCB कार्यालयात
मुंबई - आर्यन खानसंबंधीची कागदपत्रे देण्यासाठी शाहरुख खानचा बॉडीगार्ड NCB कार्यालयात पोहोचला. आर्यन खानच्या संबंधित डॉक्युमेंट देण्याकरिता तो तेथे गेला असल्याची माहिती मिळत आहे.
20:14 October 22
नवाब मलिक यांना धमकी येत असेल तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊ - दिलीप वळसे पाटील
मुंबई - नवाब मलिक यांना धमकी येत असेल तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊ, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत. याबाबत त्यांच्याकडून माहिती घेऊ, असेही त्यांनी सांगितले आहे. नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील कार्यालयात सकाळी 7.15 दरम्यान फोन आला होताय सुरेश हुडा, असे या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती आहे. हा फोन राजस्थानमधून केल्याचेही पुढे आले आहे. दरम्यान, फोन करणाऱ्या व्यक्तीने समीर वानखेडे चांगले काम करत आहेत. त्यांना अडथळा निर्माण करू नका, अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी नवाब मलिकांना दिली आहे.
17:42 October 22
कोरेगाव भीमा प्रकरणी रश्मी शुक्ला व परमबीर सिंगांना समन्स
मुंबई/पुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना समन्स बजावले आहे. 8 नोव्हेंबर 2021पर्यंत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
17:37 October 22
कल्पिता पिंपळे आणि अंगरक्षकाला प्रत्येकी ५ लाखांची मदत
ठाणे - काही दिवसांपूर्वी फेरीवाल्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येक पाच लाखांचे अर्थसहाय्य जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून जिहाधिकारी ठाणे यांना पत्र प्राप्त झाले आहे.
16:44 October 22
गँगवारचा थरार, तिघे जण गंभीररित्या जखमी
पुणे - लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गँगवारचा थरार पहिला मिळाला आहे. गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये झालेल्या फायरिंगमध्ये तिघे जण गंभीररित्या जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामधील दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे समजते. अप्पा लोंढे गँग आणि त्याच्याविरुद्ध असलेल्या एका टोळीमध्ये हे फायरिंग झाल्याची माहिती समोर आली आहे.
16:02 October 22
कांद्याचे दर कमीच, 'अन्न आणि सार्वजनिक वितरण'चे स्पष्टीकरण
नवी दिल्ली - कांद्याचे दर कमी आहेत. आम्हाला कोठेही असाधारण वाढ दिसत नाही. राज्यांतही हीच स्थिती आहे. त्यामुळे कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध घालण्याचे दृष्टीक्षेपात नाही, असे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे म्हणाले आहेत. राज्यांना 26 रुपयांचा भाव देत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
15:04 October 22
काही जण पुन्हा पुन्हा तेच खोटे आरोप करून बदनामी करत आहेत - अजित पवार
पुणे - काही लोकांनी 25 हजार तर काही लोकांनी दहा हजार कोटींचे घोटाळे झाल्याचे आरोप केले. त्यावर वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी चौकशीदेखील केली. परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. परंतु काही जण पुन्हा पुन्हा तेच खोटे आरोप करून बदनामी करत आहेत. राज्यातील वेगवेगळे साखर कारखाने विकले गेले. त्यावर कोणीही चर्चा करत नाही. 64 वेगवेगळे कारखाने काही कंपन्यांनी विकत घेतले, तर काहींनी विकत घेऊन दुसऱ्याला चालवायला दिले, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
13:56 October 22
अनन्या पांडेची एनसीबीमध्ये हजेरी
अभिनेत्री अनन्या पांडे NCB कार्यालयाकडे रवाना
NCB कडून आज पुन्हा चौकशी होणार
आर्यन खान व्हाट्सअप चाट संदर्भात चौकशी
13:32 October 22
भररस्त्यात सहाय्यक फौजदाराला दगडाने बेदम मारहाण
औरंगाबाद ब्रेकिंग -

राजेन्द्र कसोदे गंभीर जखमी
औरंगाबाद च्या वैजापूर शहरातील घटना
12:05 October 22
भाजपकडून ओबीसी नेत्याची ताकद कमी करण्याचे प्रयत्न - रोहित पवार
Jalgaon
भाजपकडून ओबीसी नेत्याची ताकद कमी करण्याचे प्रयत्न; राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांची टीका
भाजपकडून ओबीसी नेत्याची ताकद कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या समर्थनार्थ बोलताना रोहित पवारांनी भाजपला लक्ष्य करताना ही टीका केली. आमदार पवार हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे बोलताना त्यांनी ही टीका केली.
11:51 October 22
मुंबईत दादर येथे भाजपतर्फे नितीन राऊत यांच्या विरोधात आंदोलन
स्वातंत्रवीर सावरकरांबद्दल काँग्रेसचे वरिष्ठ नेते व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे आक्षेपार्ह ट्विट. मुंबईत दादर येथे भाजपतर्फे नितीन राऊत यांच्या विरोधात आंदोलन सुरू.
09:42 October 22
सेन्सेक्स 320 अंकांवर वाढला
सेन्सेक्स 320 अंकांवर वाढला, सध्या 61,248 वर. निफ्टी 18,272 वर.
09:29 October 22
एनसीबीने एका २२ वर्षाच्या मुलाला घेतले रात्री उशिरा ताब्यात
NCB अपडेट
रात्री उशिरा 3.45 च्या सुमारास, एनसीबी टीम 20 ते 22 वर्षांच्या मुलाला घेऊन आली आहे. जरी एनसीबी अधिकारी हा मुलगा कोण आहे याबद्दल कोणतीही माहिती देत नसले तरी, सूत्रांनुसार, तो ड्रग पॅडलर असल्याचे सांगितले जात आहे.
06:46 October 22
Breaking : अनन्या पांडेची एनसीबीमध्ये दुपारी दीडनंतर हजेरी
पुणे - महाराष्ट्रात आजपासून तमाम नाट्यगृहे खुली करण्यात येत आहेत. यानिमित्ताने आज शुक्रवार दिनांक 22 ऑक्टोबर सकाळी 7:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सुप्रसिद्ध दिग्दर्शक लेखक नागराज मंजुळे तसेच अनेक चित्रपट, नाट्य सृष्टीतील कलाकार यांच्या प्रमुख उपस्थितीत नटराज पूजनाचा आणि कलाकारांचा कला सादरीकरणाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला कलाकार, तंत्रज्ञ आणि रंगभूमीवरील पडद्यामागील कलाकार उपस्थित राहणार आहेत.