पुणे - जिथे गर्दी होणार तीथे गुन्हे दाखल होणार अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी दहीहंडीचा निर्णय मुख्यमंत्री यांच्या स्थरावर झाला आहे. तसाच गणेशोत्सवाबाबतही मुख्यमंत्री निर्णय घेतील. असही पवार म्हणाले आहेत. लसीकरणाच्या संबंधीत सिरमबाबत बोलणे सुरु आहे. आदर पूनावाला पुण्यात आल्यानंतर त्यांच्याशी पुन्हा बोलणे होईल. तसेच, ते मदत करायला तयार आहेत असही पवार यांनी सांगितले आहे.
तिसरी लाट येण्याच्या आधी जास्तीत जास्त वॅक्सिनेशन करण्याचा प्रयत्न
आपला तिसरी लाट येण्याच्या आगोदर जास्तीत जास्त वॅस्किनेशन करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यामुळे कुणीही लसीकरणाशिवाय राहणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
एसटीच्या कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये
एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये. त्यांच्याबाबत 500 कोटी रुपयांची तरतुद करण्याचा निर्णय झाला आहे. सध्या जास्त एसटी चालत नाही. परंतु, राज्य सरकार पगाराची व्यवस्था करत आहे. तसा निर्णयही झाला आहे. सध्या थोडस वेगळे संकट आहे. वेळ होत आहे पण सगळे व्यवस्थित होईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
महापालिका निवडणुका
आम्ही कुठेही चर्चा न करता आमच्या नावाने चर्चा होत आहे. सरकार बैठक घेऊन निवडणुकीबाबत निर्णय घेणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. त्याबाबतची पुढच्या आठवड्यात बैठक होणार आहे. याबाबतचा सध्या अंतिम निर्णय अजून झालेला नाही. निवडणुकांबाबत मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांची बैठक झाली. यामध्ये सर्व पक्षीय गटनेते उपस्थित होते. तसेच, ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या प्रश्वानावर सगळे पक्ष सहमत आहेत. अशी माहितीही पवार यांनी यावेळी दिली आहे.