ETV Bharat / state

Maharashtra Breaking Live : नारायण राणे यांना अखेर जामीन मंजूर; महाड न्यायायलयाचा निर्णय - undefined

rane
rane
author img

By

Published : Aug 24, 2021, 7:32 AM IST

Updated : Aug 24, 2021, 10:57 PM IST

22:42 August 24

  • नारायण राणे यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला.

22:38 August 24

  • महाड न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण

22:31 August 24

  • नारायण राणे यांच्या पत्नी निलम राणे या सुद्धा न्यायालयात दाखल

22:17 August 24

  • पोलिसांकडून नारायण राणेंच्या सात दिवसाच्या कोठडीची मागणी

21:52 August 24

  • नारायण राणेंच्या अटकेच्या निषेधार्थ सिंधुदुर्गात भाजपा कार्यकर्त्यांनी काही मार्गांवर झाडे तोडून वाहतूक बंद केली.

20:41 August 24

  • नारायण राणेंना घेऊन पोलीस महाडच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल
  • थोड्याच वेळात नारायण राणे यांची वैद्यकीय तपासणी होणार
  • तसेच नारायण राणे यांना आजच न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती

20:37 August 24

  • नारायण राणे महाडमध्ये दाखल

19:40 August 24

  • नारायण राणेविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • महापौर जयश्री महाजन यांनी दिली तक्रार

19:38 August 24

रायगड (महाड) - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर त्यांना संगमेश्वर येथून महाड येथे आणण्यासाठी येत आहे. थोड्याच वेळात ते महाडमध्ये दाखल होणार आहे. या पार्श्वभूमिवर महाडला छावणीचे स्वरूप आले आहे. शहरात तसेच पोलीस ठाणे, न्यायालयाबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे महाडमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. 

18:52 August 24

  • नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून नालासोपाऱ्यात शिवसेना आक्रमक
  • राणेंच्या बॅनरला चपलेचा हार चढवून व्यक्त केला संताप
  • कानाखाली काय असते ते वसई-विरारमध्ये आल्यावर दाखवून देऊ - शिवसेना कार्यकर्ते
  • शेकडोहून अधिक शिवसैनिकांचा आंदोलनात सहभाग

18:52 August 24

नागपूरमध्ये युवासेनेचे आंदोलन

नागपूर - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या बेताल वादग्रस्त वक्त्यावरून शिवसेनेकडून सुरू झालेला राडा नागपूरातदेखील बघायला मिळाला. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी नारायण राणे विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. नागपूरच्या महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांनी नारायण राणे यांना शिव्यांची लाखोळी वाहिली. एवढंच नाही तर संतप्त युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी राणे कोंबडीचोर असल्याच्या घोषणा देत कोंबड्यांसाह आंदोलन केले. 

17:36 August 24

राणे विरुद्ध शिवसेनेच्या वादात मनसेची उडी

ठाणे - कालपासून सुरु असलेल्या राणे विरुद्ध शिवसेनेच्या वादात मनसेने उडी घेतली आहे. मनसेचे एकमेव आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी ट्वीट करत जंगी 'सामना' तंगी 'प्रहार' म्हणत राणे विरुद्ध शिवसेनेत सुरु असलेल्या वादात मिश्किलपणे टीका करत चिखलफेख विरुद्ध दगडफेक असा टोमणा मारला आहे. 

17:21 August 24

नारायण राणेंच्या अटकेवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे ट्वीट

  • महाराष्ट्र सरकार द्वारा केंद्रीय मंत्री नारायण राणे जी की गिरफ़्तारी संवैधानिक मूल्यों का हनन है। इस तरह की कार्यवाही से ना तो हम डरेंगे, ना दबेंगे।
    भाजपा को जन-आशीर्वाद यात्रा में मिल रहे अपार समर्थन से ये लोग परेशान है।
    हम लोकतांत्रिक ढंग से लड़ते रहेंगे, यात्रा जारी रहेंगी।

    — Jagat Prakash Nadda (@JPNadda) August 24, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र सरकारने अटक करणे हे घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन आहे. अशा कृतीमुळे आम्ही घाबरणार नाही किंवा दडपणार नाही. हे लोक जन-आशीर्वाद यात्रेत भाजपाला मिळत असलेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे त्रस्त आहेत. आम्ही लोकशाही पद्धतीने लढत राहू, प्रवास चालूच राहणार, अशी प्रतिक्रिया भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्वीट द्वारे दिली आहे. 

17:11 August 24

नारायण राणेंच्या अटकेवर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

  • शिवसेनेचीच आहे नारायण राणेची भाषा, महाविकास आघाडीच्या लोकांनीही मारत बसा आता माश्या, यांच्याकडून लोकांना अजिबात नाही आशा, म्हणून या नारायण राणेकडून घ्यायला मिळतो पराशा - रामदास आठवले
  • उद्धव ठाकरेंनी भाषणातून उत्तर द्यायला पाहिजे होतं - - रामदास आठवले

16:47 August 24

नारायण राणेंवरील कारवाईवर देंवेंद्र फडणवीसांची ट्विटद्वारे प्रतिक्रिया

  • केंद्रीय मंत्री श्री नारायणराव राणे यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने केलेली आहे.

    पोलिस यंत्रणेचा दुरूपयोग करीत होत असलेल्या या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो.

    शर्जिल उस्मानी मोकाट आणि
    नारायण राणे यांना अटक!

    हे आहे नवे हिंदूत्त्व आणि
    असा आहे नवा महाराष्ट्र !!!#NarayanRane

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 24, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने केलेली आहे.
  • पोलिसांच्या या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो.
  • शर्जिल उस्मानी मोकाट आणि नारायण राणे यांना अटक!
  • हे आहे नवे हिंदूत्त्व आणि असा आहे नवा महाराष्ट्र

16:37 August 24

नारायण राणेंवर झालेल्या कारवाई विरोधात चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद

  • नारायण राणेंना झालेली अटक सुडापोटी
  • जनआशीर्वाद यात्रेला मिळालेल्या प्रतिसादाला घाबरून नारायण राणेंना अटक
  • प्रत्येकाची एक वेगळी शैली असते
  • पूर्ण देश नारायण राणेंच्या पाठीशी आहे

16:29 August 24

  • नारायण राणेंच्या अटकेविरोधात भाजपाचे केंद्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांची पत्रकार परिषद
  • महाराष्ट्रात वसुलीचं सरकार - संबित पात्रा
  • नारायण राणेंवर झालेली कारवाई म्हणजे लोकशाहीवर झालेला हल्ला- संबित पात्रा

16:27 August 24

  • नारायण राणेंच्या अटकेविरोधात प्रसाद लाड यांचे संगमेश्वर पोलीस ठाण्यात आंदोलन

15:49 August 24

  • आज दिवसभरासाठी जनआर्शीवाद यात्रा स्थगित - प्रमोद जठार

15:34 August 24

  • नारायण राणेंना यांना संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं
  • नाशिक पोलिसांच्या विनंतीवरून रत्नागिरी पोलिसांची कारवाई

15:24 August 24

  • नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे.

15:11 August 24

  • केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

15:09 August 24

  • नारायण राणे यांची वैद्यकीय तपासणी सुरू; त्यांचा बीपी आणि शुगर वाढली असल्याची प्रमाेद जठार यांची माहिती

15:05 August 24

  • नारायण राणे यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

14:56 August 24

  • स्थानिक पोलीस अधिक्षक नारायण राणेंना अटक करण्यासाठी आले आहेत. मात्र, त्यांच्याकडे अटक वॉरंट नाहीत. तसेच आमच्यावर दबाव आहे, असे पोलिसांनी म्हटले असल्याची माहिती जनआशीर्वात यात्रेचे प्रमुख प्रमोद जठार यांनी दिली.

14:51 August 24

  • नारायण राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर तातडीने सुनावणी करण्यास उच्च न्यायायलयाचा नकार

14:40 August 24

  • रत्नागिरी - रत्नागिरी न्यायालयाने नारायण राणे यांचा अंतरिम जामीन फेटाळला असून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

13:49 August 24

नारायण राणे यांच्या विरोधात पालघरमध्येही शिवसैनिक आक्रमक

पालघर ब्रेकिंग -

- नारायण राणे यांच्या विरोधात पालघरमध्येही शिवसैनिक आक्रमक

- रस्त्यावर उतरत शिवसैनिकांचे हुतात्मा स्तंभाजवळ आंदोलन

- जोडे मारो, शाईफेक करत शिवसैनिकांकडून नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन

- हुतात्मा स्तंभाजवळ रस्त्यावर उतरलेल्या शिवसैनिकांकडून नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

13:45 August 24

नारायण नारायण राणेंच्या मुद्द्यावरून जळगावात भाजप-सेना कार्यकर्ते आपापसात भिडले

Jalgaon breaking

- केंद्रीय मंत्री नारायण नारायण राणेंच्या मुद्द्यावरून जळगावात भाजप-सेना कार्यकर्ते आपापसात भिडले, भाजप कार्यालयात जोरदार खडाजंगी, एकमेकांना धक्काबुक्की

- भाजप आणि सेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी, तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांची तारांबळ, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक,

- शिवसेना कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यालयात तोडफोड करण्याचा प्रयत्न

- पोलिसांनी आक्रमक कार्यकर्त्यांना बळाचा वापर करून बाहेर काढले

- जळगावात भाजप आणि शिवसेनेच्या  कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री, शिवसेना कार्यकर्त्यांकडून जय भवानी, जय शिवाजी, उद्धव ठाकरे आगे बढोच्या घोषणा तर भाजपकडून वंदे मातरम, भारत माता की जय, हमसे जो टाकरायेगा, मिट्टी मे मिल जायेगा, नारायण राणे आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजी

- शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात फेकल्या कोंबड्या, भाजप कार्यकर्त्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने तणाव

- पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बळाचा वापर करून हुसकावून लावले

- जळगावात केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरुद्ध शिवसेनेची लेखी तक्रार; गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी

12:25 August 24

नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका :

मुंबई : मुख्यमंत्रीपद हे घटनात्मक असून त्यांच्यावर केंद्रिय मंत्री राणे यांनी असभ्य भाषेत टीका केली. या प्रकरणी महानगरप्रमुख बडगुजर यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, ही गुन्हेगारी स्वरुपाची तक्रार नाही. राणेहे केंद्रिय मंत्री आहे. प्रोटोकाल सांभाळूनच त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सांगितले. तसेच नाशिकमध्ये भाजप कार्यालय फोडणार्‍यावर कारवाई केली जाईल. कारवाई पक्ष पाहून नाही तर कायद्यानुसार केला जाईल, असा इशारा पाण्डेय यांनी दिला आहे.

12:18 August 24

नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका :

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ॲक्टिव्ह व्हावे यासाठी केले आहे. त्यांचा अपमान करण्याचे उद्दिष्ट त्या वक्तव्यातुन नव्हते, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. नागपुरच्या दौऱ्यावर आले असताना विमानतळावर पत्रकारांशी बोलले. हा वाद मिटण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बॅक टू पव्हेलियन करण्याची गरज आहे, असे मला वाटत असल्याचेही रामदास आठवले म्हणाले.

12:17 August 24

अमरावतीत शिवसैनिकांनी पेटवले भाजप कार्यालय; दगडफेकही केली

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात राज्यभर पडसाद उमटत आहे. अमरावतीत शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयावर  हल्ला करून जाळपोळ केली. युवासेनेचे जिल्हाप्रमुख पराग गुढदे यांच्या नेतृत्त्वात शेकडो शिवसैनिकांनी राजापेठ परिसरातील भाजप कार्यालयावर सकळी 10.30 वाजेच्या सुमारास हल्ला केला. यावेळी भाजप आणि भाजपच्या नेत्यांविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. कार्यालयावर असणाऱ्या पक्षाच्या नावावर काळी शाई फासण्यात आलो तसेच कार्यालयाबाहेर असणारे फलक जाळण्यात आले. दगड आणि काठ्या मारून कार्यालयाच्या काचा फोडण्यात आल्या.

11:30 August 24

Jalgaon breaking - शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते जळगाव शहर पोलीस ठाण्यात

Jalgaon breaking

-केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नारायण राणेंविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते

-नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना आक्रमक, शहर पोलीस ठाण्याच्या आवारात नारायण राणेंविरुद्ध जोरदार घोषणाबाजी

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्याची शिवसेना महिला आघाडीची मागणी

11:11 August 24

महाराष्ट्रात सत्तेचा दुरुपयोग - चंद्रकांत पाटील

Pune breaking

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य -

हा सत्तेचा दुरुपयोग सुरु आहे, कायद्याने केंद्रीय मंत्र्याला अटक करता येत नाही. राज्य सरकारला न्यायालयाकडून फटका बसेल.

उद्वव ठाकरे पंढरपूरला भाषणात मोदींना चोर म्हणाले,  झाला का गुन्हा दाखल. मी नारायण राणेंच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही. पण तुम्ही कारवाई काय करता हे महत्वाचे. त्यांना समज देता येईल. नारायण राणे नारळासारखे.  वरुन टणक आतून ते तसे नाहीत.

10:43 August 24

जन आशीर्वाद यात्रा :

दौरा होणारच - जन आशीर्वाद यात्रा प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार

10:42 August 24

नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका :

अटकेचे आदेश काढायला पोलीस आयुक्त काय राष्ट्रपती आहे का ? - नारायण राणे 

10:14 August 24

नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका :

अहमदनगर - नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल

  • पोलिसांना दिला तक्रार अर्ज
  • शिवसैनिक राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याच्या तयारीत..

10:12 August 24

नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका :

नाशिक - येथील भाजप कार्यालयावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक

09:40 August 24

नारायण राणे हे गरिमा नसलेले भूत - मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव - 'नारायण राणे हे गरिमा नसलेले भूत आहे. त्यांना काय बोलावे, याचे भान राहत नसेल तर ठाण्यातील वेड्यांच्या इस्पितळात दाखल करून शॉक द्यायला पाहिजे. मला तर त्यांची कीव येते', अशी शब्दांत शिवसेना नेते आणि राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर जहरी टीका केली आहे.

09:28 August 24

नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका :

नारायण राणेंच्या जुहूतील निवासस्थान समोर पोलीस बंदोबस्त

नारायण राणेंच्या जुहूतील निवासस्थान समोर पोलीस बंदोबस्त वाढवला. राणे यांचे समर्थक जुहू येथील बंगल्यावर पोहोचले. राणे यांचे पुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी ट्विट केले होते की, युवासेना यांना जुहूमध्ये लोकांना घरी पाठवण्यास सांगितले गेले आहे, पोलिसांनी त्यांना थांबवावे. एकतर मुंबई पोलीस त्यांना तेथे येण्यापासून रोखतील, अन्यथा जे काही होईल ते त्याला जबाबदार असेल. सिंहाच्या गुहेत जाण्याचे धाडस करू नका! आम्ही वाट पाहू. - आमदार नितेश राणे 

09:28 August 24

मुंबई - गणेश कुमार यादव या मुंबई काॅग्रेसच्या स्ट्रॅटेजी कमिटी सचिवाकडून एक अहवाल सादर झाला आहे. यात मुंबई मपौरपदासाठी रितेश देशमुख, सोनू सूद किंवा मिलिंद सोमण यांच्या नावांचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. या स्ट्रॅटेजी कमिटीत एच.के पाटील, अशोक चव्हाण, नाना पटोले, भाई जगताप, अस्लम शेख, वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरे, विरोधी पक्ष नेते रवी राजा हे सर्व नेते आहेत. या नेत्यांच्या कमिटीसमोर हा रिपोर्ट विचारार्थ ठेवण्यात येईल.

08:55 August 24

नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या टीकेनंतर पुण्यातही त्यांच्यावर गुन्हा दाखल

08:54 August 24

नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका :

पोलीस अधीक्षक सचिन बारी चिपळूणच्या हॉटेल रिमझध्येमध्ये दाखल; नारायण राणे हॉटेल रिमझमध्ये थांबले असल्याची माहिती

08:12 August 24

नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका :

नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका : औरंगाबादमध्येही गुन्हा दाखल

08:07 August 24

नारायण राणेंवर गुन्हा दाखल :

रायगड - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील वादग्रस्त विधानावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवासेना अधिकारी सिद्धेश पाटेकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भाजप कार्यकर्त्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कोरोना प्रतिबंधक कायद्यार्तगत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

07:46 August 24

नारायण राणे कोंबडी चोर, असे फलक मुंबईत लागले

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल (सोमवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. मुंबईत दादर टीटी भागात स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांनी नारायण राणे यांचे मोठे फोटो फलक लावून त्यावर "कोंबडी चोर" असे लिहिले आहे. 

  • मुंबईत तणावपुर्ण वातावरण
  • याचे पडसाद आणखीन तीव्र उमटण्याचीही शक्यता

07:30 August 24

सोपोरमध्ये चकमक :

सोपोरमध्ये चकमक सुरू झाली आहे. पोलीस आणि सुरक्षा दले ही कारवाई करत आहेत, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली.

07:12 August 24

केद्रीय मंत्र्यांवर गुन्हा दाखल :

नाशिक - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात नाशिकमध्ये पहिला गुन्हा दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर राणे यांनी टीका केली होती. याप्रकरणी नाशिकच्या सायबर पोलिसांनी शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीहून गुन्हा दाखल केला.

Last Updated : Aug 24, 2021, 10:57 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

Breaking
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.