- अहमदनगर - राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज (१८ जानेवारी) जाहीर होणार आहे. गावा-गावात या निकालांची उत्सुकता शिगेला पोहचली असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यातील आदर्शगाव हिवरे बाजार येथील ग्रामपंचायत निकाल स्पष्ट झाला असून सरपंच पोपटराव पवार यांच्या ग्रामविकास पॅनेलने सातही जागा जिंकल्या आहेत.
सविस्तर वाचा - हिवरेबाजारला ग्रामविकास पॅनलची बाजी; पोपटराव पवारांचे वर्चस्व सिद्ध
- औरंगाबाद - जिल्ह्यातील 'आदर्श गाव' अशी ओळख असलेल्या पाटोदा गावाच्या राजकारणात भूकंंप झाला आहे. तीस वर्षे पाटोद्याच्या ग्रामपंचायतीत एक हाती सत्ता असलेले भास्करराव पेरे पाटील यांच्या पॅनेलचा निवडणुकीत धुव्वा उडाला. त्यांच्या मुलीलाही या निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहावे लागले. ग्रामपंचायत निवडणुकीचा हा निकाल भास्करराव पेरे पाटलांना धक्का देणारा ठरला.
सविस्तर वाचा - 'आदर्श' गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटलांच्या पॅनलचा दारूण पराभव
- मुंबई - राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज (१८ जानेवारी) जाहीर होणार आहे. गावा-गावात या निकालांची उत्सुकता शिगेला पोहचली असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
सविस्तर वाचा - राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज
- औरंगाबाद - ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज (सोमवार) सकाळपासून होणार आहे. मतमोजणी करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. या मतमोजणीचा निकाल शांततेत स्वीकारा, असे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
सविस्तर वाचा - ग्रामपंचायत निवडणूक निकाल : जल्लोष केल्यास होणार कारवाई
- मुंबई - अर्णब गोस्वामी आणि बार्क माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थोदास गुप्ता यांच्यातील व्हाटस्अॅप संभाषण बाहेर आल्यानंतर अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. त्यावरून आता शिवसेनेने अन्वय नाईक प्रकरणात अर्णबची बाजू घेणाऱ्या भाजपाला निशाण्यावर अर्णबने भाजपाचे तोंड काळे केले असल्याची टीका केली आहे.
सविस्तर वाचा - 'गोस्वामी टोळीने राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढून भाजपचे तोंड काळे केले'
- नवी दिल्ली - आज सर्वोच्च न्यायालयात कृषी कायद्यांच्या संदर्भात सुनावणी होणार आहे. केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांच्या माध्यामातून दाखल केलेल्या याचिकेवर देखील सुनावणी होणार आहे. येत्या प्रजासत्ताक दिनाला (२६ जानेवारी) शेतकरी संघटनांच्यावतीने ट्रॅक्टर रॅली काढली जाणार आहे. त्यामुळे कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन गोंधळ होऊ शकतो. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांना रॅली व आंदोलन थांबण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या याचिकेत केली गेली आहे.
सविस्तर वाचा - शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली संदर्भात सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
- चंद्रपूर - टीआरपी घोट्याळात आरोपी असलेला पत्रकार अर्णब गोस्वामी याच्या विरोधात चंद्रपूर येथे पोलीस तक्रार करण्यात आली आहे. राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. अर्णब गोस्वामी याचे व्हाट्सअप्प संभाषण उघडकीस आल्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली.
सविस्तर वाचा - अर्णब गोस्वामीविरोधात चंद्रपुरात तक्रार दाखल; युवक काँग्रेसकडून कारवाईची मागणी
- नवी दिल्ली - संसदेच्या माहिती तंत्रज्ञानावरील स्थायी समितीने समाज माध्यम कंपनी फेसबुकसह ट्विटरला समन्स बजावले आहे. समाज माध्यमाचा गैरवापर रोखण्यासंदर्भात हे समन्स बजावण्यात आले आहे. या समन्सनुसार समाज माध्यम कंपनीच्या प्रतिनिधीला 21 जानेवारीला स्थायी समितीसमोर हजर राहावे लागणार आहे.
सविस्तर वाचा - संसदीय समितीचे फेसबुकसह ट्विटरला समन्स; हजर राहण्याचे आदेश
- मुंबई - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. पश्चिम बंगालमधील मुख्य लढत ही ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये असली तरी बाकी राजकीय पक्ष देखील आपले नशीब आजमवणार आहेत. महाराष्ट्रात असलेला राजकीय दबदबा निर्माण करण्यासाठी शिवसेना देखील बंगालच्या विधानसभा निवडणुका लढवणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.
सविस्तर वाचा - जय हिंद.. जय बांगला! शिवसेना लढवणार बंगालची निवडणूक
- नागपूर - नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही, हे कॉंग्रेसला दिसत नाही. केंद्रसरकारचे कायदे शेतकऱ्याला स्वातंत्र्य देणारे आहेत. तरीही काँग्रेस बेशरमा सारखे आंदोलन करून नौटंकी करत असल्याचा आरोप माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केला. ते नागपूरात राज भवनाबाहेर माध्यमांशी बोलत होते. राज्यपालांची भेट घेऊन त्यांनी विदर्भावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा राज्यपालांना वाचून दाखवला.
सविस्तर वाचा - आंदोलन करून काँग्रेस नौटंकी करत आहे; अनिल बोंडेंची टीका