ETV Bharat / state

आज...आत्ता... शुक्रवार रात्री १२ पर्यंतच्या  महत्वाच्या बातम्यांवर एक नजर - world cup

साताऱ्यात राजे विरुद्ध राजे संघर्ष पेटला, उदयनराजेंवर टीका करताना रामराजेंची जीभ घसरली, राज्य मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंला एका मंत्रिपदाची लॉटरी; आठवलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर सामूहिक बलात्कार, 3 जण अटकेत, पुण्यात हेल्मेटवाले चक्रावले, पोलिसांनी पावती फाडण्याऐवजी दिले गिफ्ट व्हाऊचर, CRICKET WORLDCUP: साहेबांचा वेस्ट इंडीजवर ८ विकेट्सनी दिमाखदार विजय

संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jun 14, 2019, 11:56 PM IST

साताऱ्यात राजे विरुद्ध राजे संघर्ष पेटला, उदयनराजेंवर टीका करताना रामराजेंची जीभ घसरली

सातारा - खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका करताना विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची जीभ घसरली आहे. साताऱ्यातील ३ कुत्री पिसाळलेली आहेत, त्यांना आवरा अन्यथा आपणही पिसाळलेले राजकारण करु असा इशारा रामराजेंनी दिला आहे. नीरा देवघर पाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी रामराजे यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. त्याला उत्तर देताना आज रामराजेंची जीभ घसरली.वाचा सविस्तर...

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंला एका मंत्रिपदाची लॉटरी; आठवलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई - लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना महायुतीला भरघोस यश देण्यामध्ये रिपाइंचा महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एका मंत्रिपदाची मागणी तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत 10 जागा आणि रिक्त महामंडळांवरील नियुक्‍त्या, अशा सर्व मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.वाचा सविस्तर...

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर सामूहिक बलात्कार, 3 जण अटकेत

नाशिक - लग्नाचे आमिष दाखवून एका 22 वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे.वाचा सविस्तर...

पुण्यात हेल्मेटवाले चक्रावले, पोलिसांनी पावती फाडण्याऐवजी दिले गिफ्ट व्हाऊचर

पुणे - चौकाचौकात वाहतुकीचे नियमन करणारा ट्रॅफिक पोलीस दिसला की अनेकांना घाम फुटतो...त्यांनी पकडल्यास आपला खिसा रिकामा होणार असा अनेकांचा समज असतो. पुण्यातील प्रमुख रस्त्यावर मागील काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांची कारवाई जोरात सुरू आहे.वाचा सविस्तर...

CRICKET WORLDCUP: साहेबांचा वेस्ट इंडीजवर ८ विकेट्सनी दिमाखदार विजय

साउथहॅम्पटन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत आज यजमान इंग्लंडसमोर बेभरवशी वेस्ट इंडिजचे आव्हान होते. इंग्लंडने एकतर्फी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजवर ८ विकेट्सनी विजय मिळवला. शतकी खेळीसाठी जो रुटला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.वाचा सविस्तर...

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.