ETV Bharat / state

आज...आत्ता...शनिवार ०१ जून २०१९ संध्याकाळी ७ पर्यंत महत्वाच्या बातम्या

दाभोलकर खून प्रकरण: जप्त केलेल्या लॅपटॉपसह मोबाईलची होणार तपासणी, भाजपनेच केला आनंदराव अडसुळांचा गेम, अभिजीत अडसूळांचा खळबळजनक आरोप, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात १ रुपया २३ पैशांची वाढ, बिगर अनुदानित २५ रुपयाने महाग, बीडमध्ये सापडले चक्क विमानाचे अवशेष, २०१३ मध्ये सापडला होता विमानाचा फॅन,स्ट्रीट फूड खाताय.. मुंबईत इडली तयार करण्यासाठी चक्क शौचालयातलं पाणी, व्हिडिओ व्हायरल.

संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jun 1, 2019, 7:02 PM IST

दाभोलकर खून प्रकरण: जप्त केलेल्या लॅपटॉपसह मोबाईलची होणार तपासणी

पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना ४ जूनपर्यंत सीबीआय कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, सीबीआयने तपासादरम्यान मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला असून, जप्त केलेल्या वस्तू तपासणीसाठी न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आल्या आहेत, अशी माहिती सीबीआयच्या वतीने न्यायालयात देण्यात आली आहे.वाचा सविस्तर...

भाजपनेच केला आनंदराव अडसुळांचा गेम, अभिजीत अडसूळांचा खळबळजनक आरोप

अमरावती - मतदारसंघात आनंदराव अडसूळ यांच्या पराभवामागे भाजपचाच गेम असल्याचा खळबळजनक आरोप आनंदराव अडसूळ यांचे पुत्र आणि माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी केला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष यांनी निवडणूक काळात पैशांची डीलिंग केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. तसेच भाजपचे अनेक नगरसेवक, कार्यकर्ते निवडणुकीच्या दिवशी गायब होते, असेही अभिजित अडसूळ यांचे म्हणणे आहे.वाचा सविस्तर...

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात १ रुपया २३ पैशांची वाढ, बिगर अनुदानित २५ रुपयाने महा

नवी दिल्ली - घरगुती स्वयंपाकात वापरण्यात येणाऱ्या एलपीजी सिलिंडरचे दर आजपासून १ रुपया २३ पैशाने वाढले आहेत. तर बिगर अनुदानित सिलिंडर घेणाऱ्यांना २५ रुपयांची दरवाढ करण्यात करून सरकारने मोठा झटका दिला आहे.वाचा सविस्तर...

बीडमध्ये सापडले चक्क विमानाचे अवशेष, २०१३ मध्ये सापडला होता विमानाचा फॅन

बीड - तलावातील गाळ काढताना ७४ वर्षापूर्वी कोसळलेल्या विमानाचे अवशेष सापडले आहेत. जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील रूटी मध्यम प्रकल्पातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. हे काम चालू असताना अवशेष सापडले आहेत. यापूर्वी २०१३ सालीही येथे विमानाचा पंखा सापडला होता. वाचा सविस्तर...

स्ट्रीट फूड खाताय.. मुंबईत इडली तयार करण्यासाठी चक्क शौचालयातलं पाणी, व्हिडिओ व्हायरल

मुंबई - जर तुम्ही रस्त्यावर विक्री करण्यात येणारे खाद्यपदार्थ खात असाल, तर सावधान. ते तुमच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते. कारण, असे रस्त्यावर अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांचे एक एक गलिच्छ प्रकार समोर येत आहेत. कुर्ला स्थानकातील अस्वच्छ लिंबू सरबत विक्रीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या एका गलिच्छ इडलीवाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे दिसून येत आहे.वाचा सविस्तर...

Intro:Body:

Dummy

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.