कर 'नाटकी' सत्तेचा पट आता गोव्यात, सर्व आमदारांना मुंबईतून हलविले
मुंबई- कर्नाटकी सत्तेचा पुढील पट आता भाजपशासीत गोव्यात पार पडणार आहे. कर्नाटक सरकारचे संकटमोचक डी.के. शिवकुमार पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून १६ नाराज आमदारांना गोव्याच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे. काही वेळापूर्वीच हे आमदार रस्ते मार्गाने गोव्याच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते.वाचा सविस्तर...
मंगळवारी मुंबई-ठाण्यात होणारा रिक्षाचालकांचा संप तूर्तास मागे, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर निर्णय
मुंबई - विविध मागण्यांसाठी रिक्षा चालक संघटनांनी सोमवारी मध्यरात्रीपासून पुकारलेला बेमुदत संप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आला आहे.वाचा सविस्तर...
मुंबई काँग्रेसमध्ये ट्विटर युद्ध; निरुपम-जगताप वाद पेटण्याची शक्यता
मुंबई - लोकसभा निवडणुकीत मुंबईत दारुण पराभव झाल्यानंतर काल मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा राजीनामा दिला. त्यांनतर मुंबई काँग्रेसमधील वादाला पुन्हा तोंड फुटले आहे. देवरा यांच्या राजीनाम्यानंतर माजी मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी काल एक वादग्रस्त ट्विट करून देवरा यांची खिल्ली उडवली होती. त्या ट्वीटला भाई जगताप यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसी असल्याचा दावा करणारे नेतेच जातीयवाद आणि भाषावादाचे राजकारण करतात, असे त्यांनी टि्वटरच्या माध्यामातून म्हटले आहे.वाचा सविस्तर...
मुंबईत बेस्टचा प्रवास झाला 'बेस्ट', फक्त ५ रुपयात किमान प्रवास शक्य..
मुंबई - बेस्ट बसचा भाडेकपातीचा प्रस्ताव राज्याच्या परिवहन विभागाने मान्य केला असून, बेस्टचा 'किमान प्रवास' आता 'पाच रुपयात' होणार आहे. देशातल्या इतर राज्याच्या तुलनेत महाग असणाऱ्या मुंबई शहरात या भाडेकपातीमुळे स्वस्त प्रवास करणे शक्य होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे मुंबईकरांकडून स्वागत केले जात आहे.वाचा सविस्तर...
ICC WC 2019 : उपांत्य फेरीपूर्वी हार्दिक पांड्या ट्रोल; 'हे' आहे कारण
लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील उपांत्य सामना, भारत विरुध्द न्यूझीलंड या संघामध्ये काही तासातच रंगणार आहे. या सामन्याला काही तास उरले असून भारतीय संघाने कस्सून सराव केला. मात्र यादरम्यान, भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. पांड्याने सामना सुरु होण्याला काही तास शिल्लक असून त्याने एक फोटो ट्विट केला आहे. या पोस्टवरुन हार्दिकला ट्रोल करण्यात येत आहे.वाचा सविस्तर...