माझ्या 'त्या' वक्तव्यामुळे भावना दुखावल्या असल्यास माफी मागते - प्रज्ञासिंह ठाकूर
नवी दिल्ली - नथुराम गोडसे यांच्याबद्दलचे वक्तव्य हे माझे वैयक्तिक आहे. माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास माफी मागत असल्याचे प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सांगितले. वाचा सविस्तर..
यवतमाळमध्ये ८१ जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचे आदेश; शिक्षक महासंघासह नागरिकांची नाराजी
यवतमाळ - राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांची माहिती संकलित करण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे. मात्र, जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्ह्यातील ८१ मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. वाचा सविस्तर..
प्रशासनाचा दिखावा? पालक सचिवांच्या दुष्काळी दौऱ्यासाठी सिन्नरमध्ये रातोरात सुरू केल्या चारा छावण्या
नाशिक - राज्याच्या पालक सचिवांना दुष्काळी भागाचे दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर आज नाशिकचे पालक सचिव सीताराम कुंटे यांनी सिन्नरचा दौरा केला. मात्र, या दौर्याच्या धास्तीमुळे येथील प्रशासनाने एका रात्रीतच चारा छावण्या उभ्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. वाचा सविस्तर..
वैद्यकीय प्रवेश : आरक्षणाच्या अध्यादेशासाठी निवडणूक आयोगाची सरकारला परवानगी; उद्या मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय
मुंबई - वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशामध्ये मराठा आरक्षणाचा फायदा मिळावा यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले होते. अखेर, आरक्षणासंदर्भातला अध्यादेश काढण्यासाठी राज्य सरकारला परवानगी मिळाली आहे. तसेच उद्या म्हणजेच शुक्रवारी १७ मे रोजी त्यासंदर्भातला अध्यादेश काढला जाण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर..
अहमदनगरमध्ये लेबल बदलून मुदतबाह्य किटकनाशकांची विक्री; लाखोंचा मुद्देमाल जप्त, कृषी विभागाची कारवाई
अहमदनगर - मुदतबाह्य झालेली कीटकनाशके पुन्हा बाजारात विकण्याचा प्रकार नगरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी कृषी विभागाचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण पथकाने नगरच्या मार्केटमधील पृथ्वी ॲग्रो सर्व्हिसेसच्या गोदामावर आज (गुरुवारी) छापा टाकला. या कारवाईत मोठ्या प्रमाणात कीटकनाशके जप्त करण्यात आली आहेत. वाचा सविस्तर..