ETV Bharat / state

आज...आत्ता... संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर - pune

भंडारा जिल्ह्यात साकोली वरून लाखांदूरला जात असलेल्या काळी-पिवळी प्रवासी गाडीचे टायर फुटल्याने गाडी अनियंत्रित होऊन चुलबंदब नदीत कोसळल्याने 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे अर्थमंत्र्यांच्या ट्विटरवरून अर्थसंकल्प फुटला असल्याची घणाघाती टीका धनंजय मुंडे केली आहे. तसेच पुणेकरांना हेल्मेट सक्तीतून दिलासा मिळाला असून हेल्मेट सक्तीची कारवाई तात्काळ थांबवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिले आहेत. औरंगाबादेत दुष्काळाचा दाह कायम असून नागरिकांना रेल्वे डब्याच्या शौचालयातील पाणी प्यावं लागत आहे. तसेच राजामौलींच्या नव्या सिनेमाची प्रदर्शनाआधीच 70 कोटींची कमाई केली आहे.

संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jun 18, 2019, 6:58 PM IST

Updated : Jun 18, 2019, 7:04 PM IST

भंडारा: काळी-पिवळी पुलावरून कोसळून पाच विद्यार्थीनींसह एका महिलेचा मृत्यू; 3 जण गंभीर जखमी

भंडारा- साकोली वरून लाखांदूरला जात असलेल्या काळी-पिवळी प्रवासी गाडीचे टायर फुटल्याने गाडी अनियंत्रित होऊन चुलबंदब नदीत कोसळल्याने 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 5 विद्यार्थिनी आणि एक महिलेचा समावेश आहे. तर चालकासह 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी साकोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाचा सविस्तर...

अर्थसंकल्प फुटला ? अर्थमंत्र्यांचे भाषण थांबवले, सत्ताधारी आणणार सभापतींवर अविश्वास ठराव

मुंबई - विधानसभेच्या कामकाजात प्रचंड गोंधळ उडाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अर्थमंत्र्यांच्या ट्विटरवरून अर्थसंकल्प फुटला असल्याची घटना घडली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनीच अर्थसंकल्प सभागृहाच्या बाहेर फोटल्याची घणाघाती टीका धनंजय मुंडे केली आहे. यानंतर जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली. यानंतर अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प वाचणं थांबवलं.वाचा सविस्तर...

पुणेकरांना दिलासा.. हेल्मेट सक्तीची कारवाई तात्काळ थांबवा, मुख्यमंत्र्यांचे आयुक्तांना आदेश

पुणे - पुण्यामध्ये हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरु करण्यात आली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी हेल्मेट सक्तीची कारवाई तात्काळ थांबवण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत, अशी माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली. या प्रश्नाबाबत पुण्यातील आमदारांनी मंगळवारी मुख्यंमत्र्यांची भेट घेतली. वाचा सविस्तर...

औरंगाबादेत दुष्काळाचा दाह: प्यावं लागतंय रेल्वे डब्याच्या शौचालयातील पाणी

औरंगाबाद - राज्यात भीषण दुष्काळ असून सरकार सर्वांना टँकरने पुरवठा होत असल्याचा दावा करत आहे. मात्र, औरंगाबादमध्ये पाण्यासाठी होणारी कसरत पाहिल्यावर हा दावा किती खरा आहे, हे कळते. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या गरिबांवर चक्क रेल्वेत स्वच्छतागृहात वापरण्यात येणारे पाणी चोरून भरण्याची वेळ येत आहे.वाचा सविस्तर...

राजामौलींच्या नव्या सिनेमाची प्रदर्शनाआधीच 70 कोटींची कमाई

एस.एस.राजामौली यांच्या बहुप्रतीक्षित ‘आरआरआर’ या सिनेमाने प्रदर्शनाआधीच एक रेकॉर्ड केला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच परदेशातील थिएटर राई्टसह आतापर्यंत तब्बल 70 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाचं शूटिंग अद्याप संपलेलं नाही. तरीही या सिनेमाने फक्त हक्क विकून केलेल्या कमाईने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. परदेशातील फिल्म डिस्ट्रीब्युशन हाऊस ‘फार्स फिल्म्स’ सोबत राजामौलींनी मोठी डील केली.वाचा सविस्तर...

Intro:विडिओ आणि फोटो whats app var पाठविले आहे प्लिज चेक
ANC : साकोली वरून लाखांदूर ला जात असलेल्या काळी-पिवळी प्रवासी गाडीचे टायर फुटल्याने गाडी अनियंत्रित होऊन चुलबंदबनदीत कोसळल्याने 6 लोकांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये 5 विद्यार्थिनी आणि एक महिलेचा समावेश आहे, तर चालकासह 3 लोक गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना उपचारसाठी साकोली येथे दाखल करण्यात आले आहे.

Body:दुपारी 4 साडेतीन वाजेच्या दरम्यान काळी- पिवळी प्रवासी गाडी क्रमांक MH-31-AP 8241 ही साकोली वरून लाखांदूर च्या दिशेने निघाली होती साकोली वरून 3 ते 4 किमी अंतरावर असलेल्या चुलबंद नदीच्या पुलावर गाडी आल्यावर गाडीला नियंत्रित करणारे एक नट तुटल्याने गाडी अनियंत्रित झाली त्यामुळे चालकाला गाडी नियंत्रित करण्याअगोदरच ती नदीत कोसळली, जवळपास 80 फूट खाली पडल्याने गाडीतील 6 लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे, या मृतकांमध्ये 5 विद्यार्थिनी आहेत ज्या प्रवाशांसाठी साकोली मध्ये आल्या होत्या अशी माहिती मिळत आहे. अजून तरी मृतकांची ओळळ पाठविण्याचे काम सुरू आहे तर 3 ही जखमी लोकांना साकोली येथे उपचारसाठी भरती करण्यात आले आहे.

Conclusion:
Last Updated : Jun 18, 2019, 7:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.