पराभवानंतर आघाडीतील पक्षांची पहिलीच बैठक, आगामी दिशा कशी असेल यावर चर्चा
मुंबई - लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीतील घटक पक्षांची पहिलीच बैठक पार पडली. यावेळी आघाडीतील घटक पक्षांचे अनेक नेते उपस्थित होते. दुष्काळ, लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि आगामी विधासभा निवडणुकीवर यावेळी चर्चा करण्यात आली, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. अधिक वाचा...
ठरलं..! राधाकृष्ण विखे-पाटील १ जून रोजी करणार भाजप प्रवेश
मुंबई - काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील १ जून रोजी भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करतील, अशी घोषणा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज (मंगळवार) मुंबई येथे केली आहे. ३० मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर १ जून रोजी विखे-पाटील भाजप प्रवेश करणार आहेत.अधिक वाचा...
ममतांना मोठा धक्का! तृणमूलचे २ आमदार आणि ६० नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
दिल्ली - तृणमूल काँग्रेसचे २ आणि कमुनिस्ट पक्षाच्या एका आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली येथे झालेल्या भाजप कार्यक्रमात आमदारांसोबत जवळपास ५० ते ६० नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ममता बॅनर्जींना मोठा धक्का बसला आहे.अधिक वाचा...
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : 'दोन दिवसात तोडगा न काढल्यास एक जूनपासून नायर रुग्णालय बंद करू'
मुंबई - डॉक्टर पायलच्या परिवाराने आरोग्य मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यासह नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने दोन दिवसात या प्रकरणावर तोडगा काढावा, अशी विनंतीही त्यांनी केली. अन्यथा तोडगा न निघाल्यास एक जूनपासून नायर रुग्णालय बंद करू, असा इशाराही त्यांनी दिला.अधिक वाचा...
संसदेत पहिल्यांदाच दाखल झालेल्या 'या' ग्लॅमरस खासदार टिकटॉक व ट्विटरवर झाल्या ट्रोल