ETV Bharat / state

आज...आत्ता सोमवारी संध्याकाळी 7 पर्यंतच्या महत्वाच्या बातम्या... - आज...आत्ता

पावसामुळे पश्चिम रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या मुंबई-अहमदाबाद, शताब्दी यासह १० एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या, तर १५ गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. तर दक्षिण सोलापूरातील मंद्रुप गावात अंगावर वीज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर २ जण जखमी आहेत. तसेच साईच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना प्रसादात गुंगीचे औषध टाकून तो भक्तांना खाऊ घालत त्यांना लुटणाऱया महिलेला शिर्डीत अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच आज हॅप्पी बर्थडे 'पोस्ट कार्डला 140 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याबरोबरच बीड जिल्ह्यातील आष्टी येथे धनश्री पंतसंस्थेच्यावतीने झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

आज...आत्ता सोमवारी संध्याकाळी 7 पर्यंतच्या महत्वाच्या बातम्यांवर एक नजर...
author img

By

Published : Jul 1, 2019, 7:09 PM IST

पावसाचा रेल्वेसेवेला फटका; मुंबई-अहमदाबाद, शताब्दीसह १० एक्सप्रेस रद्द, लोकलवरही परिणाम

मुंबई - आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा परिणाम रेल्वे सेवेवर झाला आहे. तसेच पश्चिम रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या मुंबई-अहमदाबाद, शताब्दी यासह १० एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या, तर १५ गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले. वाचा सविस्तर

सोलापुरात वीज पडून तिघांचा मृत्यू तर दोन जखमी, मृतांत एका महिलेचा समावेश

सोलापूर - दक्षिण सोलापूरातील मंद्रुप गावात अंगावर वीज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर २ जण जखमी आहेत. पंतुसिंग जीवनसिंग रजपूत, संकेत शिवानंद चौगुले आणि पार्वती मळप्पा कोरे, अशी मृतांची नावे आहेत. तर रविकांत राजकुमार नुळे, धरेप्पा लिंगप्पा म्हेत्रे हे दोघे जखमी आहेत. वाचा सविस्तर

शिर्डीत प्रसादात गुंगीचे औषध टाकून भाविकांना लुटायची महिला, असा झाला पर्दाफाश

अहमदनगर - शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी अनेक भक्त येत असतात. याचाच फायदा घेत देशभरातील चोरांचेही शिर्डीत आश्रय स्थान बनले आहे. अशात साईच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना प्रसादात गुंगीचे औषध टाकून तो भक्तांना खाऊ घालत त्यांना लुटणाऱया महिलेला शिर्डीत अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर

हॅप्पी बर्थडे 'पोस्ट कार्ड'...झाले 140 वर्षाचे; 'या' वर्षी झाले होते सुरू

जालना - इंग्रजांनी भारतावर राज्य करताना अनेक सुविधा उपलब्ध केल्या होत्या. त्यातीलच एक म्हणजे पोस्ट विभाग. या विभागातील महत्त्वाचे कागद म्हणजे पोस्ट कार्ड, हे पोस्ट कार्ड सुरू करून आज म्हणजेच एक जुलै 2019 ला एकशे चाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत. एक एप्रिल ते 30 जून 2019 दरम्यान 10 हजार पोस्टकार्ड विकले गेले आहेत. त्यामुळे या पोस्ट कार्डचे महत्त्व आजही कायम असल्याचे दिसत आहे. १ जूलै 1889 वर्षी हे पोस्ट कार्ड सुरू करण्यात आले होते. वाचा सविस्तर

वृक्षवल्ली आम्हा सोयरे... बीडमध्ये साजरा केला चक्क झाडांचा वाढदिवस

बीड - आतापर्यंत अनेक वाढदिवस साजरे केलेले तुम्ही बघितले असले. मात्र, जिल्ह्यातील आष्टी येथे झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. धनश्री पंतसंस्थेच्यावतीने हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. तसेच याद्वारे वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा संदेश देण्यात आला. वाचा सविस्तर

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.