LIVE विधानसभा : विरोधी पक्षनेता योग्यवेळी निवडणार - विधानसभा अध्यक्ष
मुंबई - विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवरपासून सुरू झाले आहे. यासाठी राज्यातील विधानसभेचे सदस्य सभागृहात दाखल झाले आहे. सत्ताधारी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी चांगलीच तयारी केल्याचे पाहायला मिळत आहे. तर, नवनिर्वाचित गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधानभवनात दाखल होताच 'आयाराम गयाराम, जय श्री राम' अशा घोषणा विरोधकांनी विखेंना उद्देशून दिल्या. हेही वाचा...
'आयाराम गयाराम, जय श्रीराम', विखे-पाटलांसमोर विरोधकांची घोषणाबाजी
मुंबई - विधीमंडळात सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. यावेळी नवनिर्वाचित गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील विधानभवनात येताच विरोधकांनी 'आयाराम गयाराम, जय श्रीराम' या घोषणा दिल्या. हेही वाचा...
'सबका साथ सबका विकास' या न्यायाने संसदेचे कामकाज चालवण्यास मदत करा, पंतप्रधानांचे अधिवेशनापूर्वी आवाहन
नवी दिल्ली - सतराव्या लोकसभेच्या कार्यकाळातील पहिल्या अधिवेशनाला आज सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे कामकाज निकोप आणि लोकशाही पद्धतीने पार पाडण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. संसदेबाहेर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. हेही वाचा...
दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात तिसऱ्या स्थानी; आर्थिक पाहणी अहवाल जाहीर
मुंबई - राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल जाहीर करण्यात आला आहे. या अहवालानुसार अर्थव्यवस्थेत ७.५ टक्के वाढ अपेक्षित आहे. मागील वर्षीदेखील ७.५ टक्केच अर्थव्यवस्था वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. दरडोई उत्पनांत महाराष्ट्र राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे या अहवालातून पुढे आले आहे. हेही वाचा...
स्कूल चले हम... जळगावातील शाळा गजबजल्या; ठिकठिकाणी प्रवेशोत्सव साजरा
जळगाव - तब्बल दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर सोमवारी शाळा उघडल्या. भविष्याचा वेध घेऊ शकणारी हजारो पावले शाळांच्या परिसरात पडली. चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजल्या आहेत. जळगाव जिल्ह्यासह शहरातील विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला आहे. शिक्षकांनी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, खाऊ देऊन स्वागत केले. हेही वाचा...