मुंबई : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार तथा प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असलेल्या तपासात क्लीनचीट देण्यात आली आहे. प्रसाद लाड यांच्यावर 2009 मध्ये मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या संदर्भात त्यांच्यावर 2014 मध्ये मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चिट दिली आहे. प्रसाद लाडसाठी हा मोठा दिलासा आहे. या प्रकरणात प्रसाद लाड यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला (EOW give clean chit to BJP leader Prasad Lad ) होता.
गुन्ह्यात क्लीन चिट : आर्थिक गुन्हे शाखा मुंबई पोलिसांनी भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना 2014 च्या महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात क्लीन चिट दिली आहे. ईओडब्ल्युने आपल्या सी समरी रिपोर्टमध्ये असे नमूद केले आहे की, लाडविरुद्ध पुढे खटला जाण्यासाठी कोणतेही फोर्स पुरावे उपलब्ध नाही, असा दावा रिपोर्ट मध्ये करण्यात आला (Prasad Lad in BMC Financial Misappropriation case) आहे.
आर्थिक गैरव्यवहार : लाड यांच्यावर 7 डिसेंबर 2014 रोजी मालाड पोलिसांनी बीव्हीजी क्रिस्टल जॉइंट व्हेंचरमध्ये आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. 19 मार्च 2015 रोजी प्रकरण पुढील तपासासाठी ईओडब्ल्युकडे वर्ग करण्यात आले होते. लाड हे क्रिस्टल ट्रेडकॉम प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीचे संचालक आहेत. ईओडब्ल्युच्या प्रकरणानुसार 2009 मध्ये त्यांनी सहआरोपी हणमंत गायकवाड यांच्या बीव्हीजी लीमिटेड कंपनीसोबत बीव्हीजी क्रिस्टल जॉइंट व्हेंचर नावाची संयुक्त व्यवसायिक कंपनी जेव्ही स्थापन केली. जेव्हीने जलसाठे आणि पंपिंग स्टेशन्सभोवती कंपाऊंड भिंती बांधण्यासाठी निविदा भरल्यानंतर कंपनीला काम देण्यात आले (clean chit to BJP leader Prasad Lad) होते.
सामंजस्य करार : हे परस्पर ठरले आणि अग्रवाल, लाड आणि इतर यांच्यात सामंजस्य करारही झाला. सामंजस्य करारात असे नमूद केले आहे की, बीव्हीजी क्रिस्टल जॉइंट व्हेंचरने निविदा जिंकल्यानंतर अग्रवाल हे काम करतील आणि त्या कामासाठी लागणारे पैसे देखील टाकतील आणि निविदांचे काम जसजसे पुढे जाईल तसतसे बीव्हीजी आणि क्रिस्टलला 5% रॉयल्टी देतील असे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. सर्व बँकिंग व्यवहारांसाठी बीव्हीजी क्रिस्टल जॉइंट व्हेंचरसाठी अग्रवाल हा एकमेव स्वाक्षरी करणारा अधिकार होता जेव्हीने अग्रवालच्या परवानगीशिवाय स्वतंत्र खाती उघडू नयेत. अग्रवाल यांना काम पूर्ण करण्यासाठी पॉवर ऑफ अॅटर्नी देण्यात आली होती. 2012 मध्ये टेंडरचे काम पूर्ण झाले, त्याच वेळी लाडच्या म्हणण्यानुसार कथित व्हॅट चोरीसाठी अग्रवालची चौकशी करण्यात आली आणि म्हणून अग्रवालचा पॉवर ऑफ अॅटर्नी लाड आणि गायकवाड यांनी रद्द केला होती. बँकेला पत्र लिहून कळवले की, आता ते स्वाक्षरी करणारे अधिकारी असतील. सामंजस्य कराराच्या अटींचे उल्लंघन करून हे केले गेले असे अग्रवाल (BJP leader Prasad Lad) म्हणाले.
पैसे भरण्याची विनंती : लाड आणि गायकवाड यांनी कथितपणे नवीन चालू बँक खाते उघडले. बीएमसीला त्या विक्रेत्याच्या बँक खात्यात पैसे भरण्याची विनंती केली. बीएमसीने टेंडर कामाचे २.३२ कोटी रुपये त्या बँक खात्यात भरले. अशा प्रकारे त्यांनी फसवणूक केली. अशी तक्रार अग्रवाल यांनी ईओडब्ल्युकडे केली होती. अग्रवाल यांनी बीएमसीचे टेंडर काम पूर्ण केले. त्यासाठी नागरी संस्थेकडून 10.25 कोटी मिळायचे होते. तथापि बीव्हीजी कंपनीचे गायकवाड बीव्हीजी क्रिस्टल जॉइंट व्हेंचरचे लाड आणि इतरांनी अग्रवाल यांचा विश्वासभंग केल्याचा आरोप केला आहे. बीएमसी अधिकार्यांच्या मदतीने त्यांनी फसवणूक करून पैसे घेतले असल्याचा आरोप तक्रारी करण्यात आला (BMC Financial Misappropriation case) आहे.
पुरावे उपलब्ध नाही : या प्रकरणाचा तपास पूर्ण केल्यानंतर ईओडब्ल्यूच्या जनरल चीटिंग युनिटचे इन्स्पेक्टर संदेश मांजरेकर आणि युनिट प्रभारी इन्स्पेक्टर विनय घोरपडे यांनी गेल्या आठवड्यात लाड आणि इतरांविरुद्धच्या खटल्याचा क्लोजर रिपोर्ट महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केला आहे. या प्रकरणात आरोपी ( Prasad Lad) विरोधात दिवाणी स्वरूपाचा कारवाई करण्यासाठी कोणतेही पुरावे उपलब्ध नाही, असे म्हटले आहे.