ETV Bharat / state

पर्यावरण विभाग आता पर्यावरण व वातावरणीय विभाग; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेवर मंत्रिमंडळाची मोहर

महाराष्ट्र शासनाने देखील 2011 मध्ये वातावरणातल्या बदलांवर कृती आराखडा अहवाल तयार केला असून केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्रालयाने 2014 मध्ये यास मान्यता दिली आहे.

author img

By

Published : Jun 9, 2020, 9:29 PM IST

Aditya thakre, आदित्य ठाकरे
Aditya thakre

मुंबई- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतील पर्यावरण विभागाच्या नावात बदल करून ते आता पर्यावरण व वातावरणीय विभाग, असे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

पर्यावरण विभागामध्ये वातावरणातील बदलांशी निगडीत कामे पार पाडण्यासाठी स्टेट नॉलेज मॅनेजमेंट सेंटर ऑन क्लायमेट चेंज, हा कक्ष मदत करत असून हा विषय पर्यावरण विभागाचा अविभाज्य घटक आहे. यातील कामाचा आवाका यापुढे वाढत जाणार असून जनमाणसांमध्येही जागरुकता वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाने देखील 2011 मध्ये वातावरणातल्या बदलांवर कृती आराखडा अहवाल तयार केला असून केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्रालयाने 2014 मध्ये यास मान्यता दिली आहे.

राज्य शासनाची निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी यावर्षी या विभागामार्फत 100 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मंत्री ठाकरे व राज्यमंत्री बनसोडे यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग हा निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश पंचतत्वांवर कार्य करेल. पृथ्वी तत्वाशी संबंधित वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमीन धुपीकरण इत्यादी बाबींवर हा विभाग कार्य करेल.

तसेच हवेच्या गुणवत्तेसाठी हा विभाग उद्योग, परिवहन व इतर विभागांना सहकार्य करून वायूप्रदूषण कमी करून महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता सुधारेल व वायू तत्वाचे संरक्षण करेल. तसेच जल तत्वाशी संबंधित नदी संवर्धनाच्या सद्य:स्थितील चालू कामांसह सागरी जैव विविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच सागरी किनारे यांची स्वच्छता यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

अग्नी तत्वाशी संबंधित उर्जा स्त्रोत म्हणून अन्य विभागांसह कार्य करीत उर्जाचा परिणामकारक वापर, उर्जा बचत तसेच उर्जेचा अपव्यय टाळणे या बाबींना प्रोत्साहन देत, अपारंपारिक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागा, पडीक जमिनी, शेतांचे बांध या सारख्या जागांवर राबविण्यात येणार.

आकाशाच्या विविध संकल्पनांपैकी हा विभाग आकाश या तत्वास स्थळ व प्रकाश या स्वरुपात निश्चित करून मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमांव्दारे जनमानसात आपल्या कृतीव्दारे आपला भवताल अधिक समृद्ध करण्यासाठी प्रवृत्त करेल, हा प्रयत्न आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.