ETV Bharat / state

Encounter Specialist Daya Nayak : एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची पुन्हा मुंबई पोलीस दलात बदली - एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची पुन्हा मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. दया नायक हे सध्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकामध्ये कर्तव्यावर आहेत. त्यांची अँटिलिया प्रकरणी 2021 रोजी बदली करण्यात आली होती. या बदलीच्या आदेशाला त्यांनी मॅटमध्ये अव्हान दिले होते.

Daya Nayak
Daya Nayak
author img

By

Published : Apr 19, 2023, 3:37 PM IST

Updated : May 8, 2023, 2:24 PM IST

ज्येष्ठ पत्रकार विवेक अगरवाल यांची प्रतिक्रिया

मुंबई : अनेक गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेल्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस निरीक्षक दया नायक यांची परत एकदा मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दया नायक हे सध्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकामध्ये कर्तव्यावर आहेत. गृह विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. क्या बदलांच्या यादीमध्ये दया नायक यांचे देखील नाव असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बदलीच्या आदेशाला मॅटमध्ये आव्हान : पोलीस निरीक्षक दया नायक हे दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएस मध्ये कार्यरत असून 2021 मध्ये अँटिलिया, मनसुख हिरेन प्रकरणानंतर त्यांची बदली एटीएसमधून गोंदिया येथे करण्यात आली होती. त्यावेळी देखील या बदलीमुळे मोठी चर्चा झाली होती. मात्र, या बदलीच्या आदेशाला दया नायक यांनी मॅटमध्ये आव्हान दिले होते.

मुंबई पोलीस दलात बदली : मॅटने देखील याप्रकरणी सुनावणी घेऊन स्थगिती दिली होती. मॅटने दिलेल्या स्थगितीच्या आदेशानुसार दयानक एटीएस मध्येच कार्यरत होते. पुन्हा दया नायक यांची पोलीस दलातील बदलीमुळे अनेकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या त्यात दया नायक यांची देखील एटीएस मधून मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख : पोलीस निरीक्षक दया नायक यांना एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात. 90 च्या दशकात नायक यांनी अनेक एन्काऊंटर केले आहेत. तसेच अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या देखील आवळण्यात दया नायक यांना यश आले होते. अल्पावधीतच मोठे यश दया नायक यांनी गाठले होते. दया नायक यांनी प्रदीप शर्मा यांच्यासोबत मुंबई क्राईम ब्रँचमध्ये काम सुरू केले होते. जवळपास 80 गुंडांचे एन्काऊंटर दया नायक यांनी केले आहे. म्हणूनच दया नायक यांची चकमक फेम म्हणजेच एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख आहे.

हेही वाचा - BRS Meeting: बीआरएस सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली, सभा स्थळ बदलून होणार सभा

Last Updated : May 8, 2023, 2:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.