ETV Bharat / state

मुंबई; स्कूल बसला अचानक आग, आजूबाजूची वाहनेही पेटली

author img

By

Published : Jan 4, 2021, 5:18 PM IST

रसत्यावर बस अशाच उभ्या असल्यामुळे व्यस्नी लोकांनी या बसना आपला अड्डा बनवला आहे. आणि बसमध्ये पिण्यात आलेल्या दारूमुळेच बसला आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरी या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

मुंबई; स्कूल बसला अचानक आग, आजूबाजूची वाहनेही पेटली
स्कूल बसला अचानक आग

मुंबई- मलाड मार्वे रोडवर उभ्या असणाऱ्या स्कूल बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. अग्निशामन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले असून, या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. मात्र, ही आग नेमकी कशी लागली याचा तपास पोलीस करत आहेत.

मुंबई; स्कूल बसला अचानक आग, आजूबाजूची वाहनेही पेटली

आजूबाजूच्या वाहनांनाही आग-

सध्या राज्यभरातील शाळा बंद असल्यामुळे स्कूलबसचा वापरही मंदावला आहे. मुंबईच्या मलाड मार्वे रोडवरील वीर भगतसिंग स्कूलची बस रसत्यावर उभी करण्यात आली होती. आणि बघता बघता बसला अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत बस पुर्णपणे जळून खाक झाली होती. एवढेच नाही तर बाजूला उभ्या असलेल्या आणखी एका बसला आणि तीन-चार वाहनांना तिने आपल्या चपाट्यात घेतले होते. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.

व्यस्नी लोकांचा अड्डा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.