पुणे Emergency Landing : प्रवाशानं आपल्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याचा दावा केल्यानं पुणे दिल्ली विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडींग करण्यात आलं. हे विमान पुण्यातून शुक्रवारी रात्री दिल्लीला निघालं होतं. मात्र या प्रवाशानं आपल्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याचं विमानात सांगितल्यानं विमानात मोठी खळबळ उडाली. त्यामुळे या विमानाच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.
पुण्यावरुन दिल्लीला निघालं होतं विमान : अक्सा कंपनीचं विमान क्रमांक क्यू पी 1148 हे पुण्यावरुन शनिवारी रात्री दिल्लीला जात होतं. या विमानात 185 प्रवासी प्रवास करत होते. त्यासह सहा क्रू मेंबरही विमानात प्रवास करत होते. मात्र हे विमान सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्टीय विमानतळावर या विमानाचं सुरक्षित लैंडिंग करण्यात आलं आहे. त्या प्रवाशाला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई विमानतळावरती कार्यवाही झाल्याची अधिक माहिती मुंबई पोलीस घेत आहेत. मुंबई पोलिसांनी या प्रवाशाला अटक केलेली असून त्याचं नाव अद्याप समजू शकलेलं नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
छातीत दुखत असल्यानं पसरवली अफवा : सीआयएसएफचे अधिकारी वीरेंद्रसिंह यांनी मुंबई पोलीस कंट्रोल रुमला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर BDDS टीम विमानतळावर आली. त्या प्रवाशाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. मात्र त्याच्याकडं संशयास्पद काहीच मिळालं नाही. त्यानंतर त्या प्रवाशाला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. तेव्हा त्या व्यक्तीनं आपल्या छातीत दुखत होतं. आपणास तातडीनं वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी बॉम्ब असल्याची माहिती दिल्याचं सांगितल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :
- Indigo Flight emergency landing : दिल्लीहून दोहाला जाणाऱ्या विमानाचे कराचीला आपत्कालीन लँडिंग
- Flight Emergency Landing : प्रवासादरम्यान चिमुकलीची तब्येत अचानक बिघडली, नागपुरात विमानाचं इमर्जन्सी लँडिंग
- Spicejet Emergency Landing : दिल्लीहून जबलपूरला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, केबिनमध्ये पसरला होता धूर