ETV Bharat / state

सरकारने सर्वसामान्य नागरिकांचे वीज बिल माफ करावे - सुधीर मुनगंटीवार - वीज बिल माफ बातमी

कोरोना विषाणूच्या विरोधात आपण सर्व जण लढा देत आहोत. कोरोनामुळे हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांची सर्व कामधंदे बंद झाली आहेत. त्यामुळे या संकटाच्या काळात शासनातर्फे गरीब, गरजू नागरीकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट घेऊन जगणाऱ्या नागरिकांना तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना अनेक अडचणी सहन कराव्या लागत आहेत.

electricity-bill-should-be-waived-sudhir-mungantiwar-demand-to-cm
सर्वसामान्य नागरिकांचे वीज बिल माफ करावे
author img

By

Published : Mar 30, 2020, 8:05 PM IST

मुंबई- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचार बंदीही आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गरीब गरजू चिंतेत असल्याने त्यांचे वीज बिल माफ करावे. 400 युनिट पर्यंत विजेचा वापर करणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीयांचा यात समावेश करावा, अशी मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

हेही वाचा- 'या' महामारीनंतरचे आर्थिक संकट उंबरठ्यावर आहे'

कोरोना विषाणूच्या विरोधात आपण सर्व जण लढा देत आहोत. कोरोनामुळे हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांची सर्व कामधंदे बंद झाली आहेत. त्यामुळे या संकटाच्या काळात शासनातर्फे गरीब, गरजू नागरीकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट घेऊन जगणाऱ्या नागरिकांना तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना अनेक अडचणी सहन कराव्या लागत आहेत. या परिस्थितीत 400 युनिट पर्यंत विजेचा वापर करणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय वीज ग्राहकांचे वीज बिल माफ केल्यास त्यांना मोठा दिलासा मिळेल. अशी भावना व्यक्त करीत याबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणीही मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.