ETV Bharat / state

राज्यातील नातेमय राजकारणाचे 'सासरे-जावई' कनेक्शन...

कोणत्याही निवडणुकीत घराणेशाही हा मुद्दा प्रकर्षाने चर्चेला येतो. आपली मुले, पत्नी, जवळचे नातेवाईक यांना उमेदवारी किंवा महत्त्वाची पदे मिळाली पाहिजेत, असा बहुतांशी राजकीय नेत्यांचा प्रयत्न असतो. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सासरे बुवा आणि जावई बापूंच्या सक्रिय राजकारणाची चर्चा सुरू आहे. पाहुयात असेच काही राजकारणातले सासरे-जावई यांची जोडी...

नातेमय
author img

By

Published : Sep 26, 2019, 3:58 PM IST

मुंबई - कोणत्याही निवडणुकीत घराणेशाही हा मुद्दा प्रकर्षाने चर्चेला येतो. आपली मुले, पत्नी, जवळचे नातेवाईक यांना उमेदवारी किंवा महत्त्वाची पदे मिळाली पाहिजेत, असा बहुतांशी राजकीय नेत्यांचा प्रयत्न असतो. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सासरे बुवा आणि जावई बापूंच्या सक्रिय राजकारणाची चर्चा सुरू आहे. पाहुयात असेच काही राजकारणातले सासरे-जावई यांची जोडी...

हेही वाचा - पुण्यातील पूरस्थितीकडे लक्ष द्या; मग तिकीट वाटपाच्या चर्चा करा - भुजबळ

आमदार शिवाजी कर्डिले व आमदार संग्राम जगताप-

अहमदनगर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम अरुण जगताप हे राहुरीचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत. कर्डिले आणि राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप हे व्याही आहेत. शिवाजी कर्डिले यांची मुलगी आमदार संग्राम जगताप यांची पत्नी आहे. अरुण जगताप हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत जावई-सासऱ्यांमध्ये कोण बाजी मारणार? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

कर्डिलेंचे नाते गोते आणि राजकीय पक्ष

भाजप आमदार शिवाजी कर्डिलेंचे मोठे जावई संदीप कोतकर काँग्रेसचे माजी महापौर आहेत, तर कर्डिलेंची मुलगी सुवर्णा कोतकर या देखील काँग्रेसच्या माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेविका आहेत.

हेही वाचा - EXCLUSIVE: 'वंचित'चा आणखी एक मोहरा गळाला, गोपीचंद पडळकर लवकरच स्वगृही?

कर्डिलेंचे दुसरे जावई संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, तर कर्डिलेंची दुसरी मुलगी शितल जगताप या सुध्दा नगरसेविका आहेत.

कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीनेही राजकारणात प्रवेश केला आहे. कर्डिले यांचे तिसरे जावई अमोल गाडे यांच्या पत्नी ज्योती गाडे या शिवसेनेच्या गाडे परिवारातील असून राष्ट्रवादीकडून निवडून आल्या आहेत.

हेही वाचा - पवारांवरील कारवाईबाबत काँग्रेस नेते गप्प का? इतिहासात दडलीत कारणे!

मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार हर्षवर्धन जाधव -

आमदार हर्षवर्धन जाधव हे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. आमदार हर्षवर्धन पाटील हे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे आमदार असून रावसाहेब दानवे हे जालन्यातून खासदार आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते मराठवाड्याचे नेतृत्व करत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत जाधव हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी दानवे हे जावयाचा प्रचार करणार, की युतीचे उमेदवार खैरे यांचा, असा वादही रंगला होता.

रामराजे नाईक निंबाळकर व राहुल नार्वेकर -

राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. रामराजे हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या.

आमदार बबनराव शिंदे व आमदार संग्राम थोपटे -

माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे जावई भोरचे आमदार संग्राम थोपटे एकाचवेळी राजकारण करत आहेत. सासरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे, तर जावई हे काँग्रेसचे आमदार आहेत. बबनराव शिंदे हा 1995 पासून सलग माढ्याचे प्रतिनिधीत्व करत आहेत. तसेच शिंदे हे सध्या भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. त्यांनी मुख्यमंत्री व सहकारमंत्र्यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले होते. तर, आमदार संग्राम थोपटे हे भोरचे काँग्रेसचे आमदार आहेत.

आमदार दिलीपराव देशमुख व अतुल भोसले -

काँग्रेसचे आमदार दिलीपराव देशमुख यांचे अतुल भोसले हे जावई आहेत. तेही सध्या राजकारणात सक्रिय आहेत. दिलीपराव देशमुख हे दिवंगत विलासराव देशमुख यांचे लहान बंधु आहेत, तर अतुल भोसले हे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष आहेत. त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला होता.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.