ETV Bharat / state

Election For Legislative Council : विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी 20 जूनला होणार मतदान, राजकीय पक्षांची कसोटी..? - June 20

राज्यसभेच्या निवडणुकीत पाठोपाठ विधानपरिषदेचीही निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 20 जूनला मतदान ( Election For Legislative Council ) होणार असून निवडणुकीसाठी राजकीय पक्षांत इच्छुकांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.

विधान परिषद
विधान परिषद
author img

By

Published : May 30, 2022, 10:42 PM IST

मुंबई - राज्यसभेच्या निवडणुकीत पाठोपाठ विधानपरिषदेचीही निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 20 जूनला मतदान ( Election For Legislative Council ) होणार असून निवडणुकीसाठी राजकीय पक्षांत इच्छुकांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी उमेदवारी अर्ज भरले गेले असून, 10 जूनला राज्यसभा निवडणूक पार पडेल. मात्र, त्यानंतर विधानपरिषदेचा निवडणुकीचा आखाडाही रंगणार आहे. विधान परिषदेतील दहा सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होऊन त्या जागांसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे. 2 जूनला अधिसूचना जाहीर होणार असून 9 जूनपासून अर्ज दाखल करता येणार आहेत. निवडणुकांसाठी ही राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली असून या निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

या सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण - विधान परिषदेवर भारतीय जनता पक्षाकडून असलेले प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सुजितसिंह ठाकूर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत तसेच दिवंगत नेते आरएस सिंह यांचा समावेश आहे. शिवसेनेकडून ज्येष्ठ नेते आणि आमदार दिवाकर रावते, मंत्री सुभाष देसाई हे निवृत्त होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे निंबाळकर आणि संजय दौंड यांचाही कार्यकाळ संपत आहे.

मतांची गोळाबेरीज - प्रत्येक पक्षाच्या सध्याच्या मतांची गोळाबेरीज पाहता भारतीय जनता पक्षाचे चार, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार विधानपरिषदेवर निवडून येऊ शकतो. विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या सत्तावीस मतांची गरज उमेदवाराला असते. भारतीय जनता पक्षाकडे मित्रपक्षांसह 113 आमदारांचे संख्याबळ आहे तर महाविकासआघाडीकडे एकूण 169 आमदारांचे संख्याबळ आहे. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54, शिवसेनेकडे 56 तर काँग्रेसकडे 45 आमदार आहेत. मात्र, विधान परिषदेवर काँग्रेसचाही दुसरा उमेदवार देण्यात यावा. यासाठी काँग्रेसने आता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, काँग्रेसचा दुसरा उमेदवार निवडून आणायचा असल्यास भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये लढत पाहायला मिळेल. तसेच भाजपच्या पाच जागा रिक्त होणार असून केवळ चार उमेदवारच निवडून येणार आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटातून कोणाचा पत्ता कट होणार याबाबतच्या चर्चा रंगल्या आहेत.

या उमेदवारांची लागणार पुन्हा वर्णी - भारतीय जनता पक्षाकडून विधानपरिषदेवर प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांची वर्णी जवळजवळ निश्चित मानली जात आहे. प्रवीण दरेकर हे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आहेत तर आमदार प्रसाद लाड हे देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी निकटवर्तीय मानले जातात. यामुळे या दोन उमेदवारांची नावे निश्चित असल्या तर भारतीय जनता पक्षाच्या गोटात म्हटले जाते. मात्र, तेथेच भारतीय जनता पक्षाकडून असलेले आमदार सदाभाऊ खोत आणि विनायक मेटे यांच्या उमेदवारीवर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी या नेत्यांकडूनही देवेंद्र फडणीस यांच्याकडे लॉबिंग केली जात आहे. सुजितसिंह ठाकुर यांनाही पक्षाकडून पुन्हा उमेदवारी मिळण्याची चिन्ह धूसर आहेत.

भाजपकडून इच्छुक उमेदवार - भारतीय जनता पक्षाच्या चार जागा सहज विधानपरिषदेवर निवडून येऊ शकतील. मात्र, पाचव्या जागेसाठी भाजपला रस्सीखेच करावी लागणार आहे. प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांची नावं निश्चित असताना पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना विधान परिषदेवर उमेदवारीसाठीची चर्चा भारतीय जनता पक्षात आहे. माजी मंत्री राम शिंदे यांनाही विधान परिषदेवर उमेदवारी मिळण्याबाबत चर्चा सुरू आहे.

शिवसेनेत या नावांची चर्चा - शिवसेनेकडून मंत्री सुभाष देसाई आणि माजी मंत्री दिवाकर रावते यांचा कार्यकाळ संपत आहे. मात्र, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर काढतील हे नक्की आहे. पण, दिवाकर रावते यांना पुन्हा संधी देण्याची शक्यता कमी दिसते. त्यामुळे या जागेवर शिवसेनेच्या गोटातही लॉबिंग सुरू झाला आहे. राज्यसभेवर ज्याप्रमाणे कोल्हापूरचे कडवट शिवसैनिक संजय पवार यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संधी दिली. त्याच प्रमाणे विधान परिषदेवर ही सामान्य शिवसैनिकांना संधी देण्यात येईल, अशी चर्चा शिवसेनेच्या गोटात आहे. मात्र, या जागेसाठी उर्मिला मातोंडकर यांच्या नावाचाही विचार केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राष्ट्रवादीकडून असतील हे उमेदवार - राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे निंबाळकर आणि संजय दौंड यांचा कार्यकाळ संपत असला तरी यामध्ये रामराजे निंबाळकर यांना संधी दिली जाईल, अशी दाट शक्यता आहे. रामराजे निंबाळकर हे शरद पवार यांच्या अगदी निकटवर्तीय समजले जातात. त्यातच ते विधान परिषद सभापती आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा विधानपरिषदेवरची संधी दिली जाण्याची दाट शक्यता. मात्र, संजय दौंड यांना पक्ष पुन्हा एकदा संधी मिळणार नसल्याची माहिती आहे. त्यात दुसऱ्या जागेवर अद्याप उमेदवाराची शोधाशोध सुरू आहे.

काँग्रेसकडून कोणाला मिळणार उमेदवारी - विधान परिषदेवर काँग्रेसचा एकाही आमदाराचा कार्यकाळ पूर्ण होत नाही. मात्र, मतदानाच्या टक्क्यानुसार काँग्रेसच्या एका आमदारास विधान परिषदेवर जाता येणार आहे. तसेच काँग्रेस दुसऱ्या जागेसाठीही प्रयत्न करणार आहे. त्यामुळे काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबतची उत्सुकता काँग्रेसच्या गोटात आहे.

हेही वाचा - Mumbai Bomb Blast Case : मुंबईतील बॉम्बस्फोट प्रकरणातील चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.