मुंबई - राज्य निवडणूक आयोगाने पोलीस खात्यातील कायदा व सुव्यवस्था सहआयुक्त देवेन भारती यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. महत्वाचे म्हणजे निवडणूक आयोगाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे आदेश दिल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी देवेन भरती यांची बदली लांबवण्यात आली होती. तसेच निवडणूक आयोगाने ५ एप्रिलला कोलकात्याचे पोलीस आयुक्त अनुज शर्मा आणि बिधाननगरचे पोलीस आयुक्त ज्ञानवंत सिंग यांच्या बदलीचे आदेश दिले होते. या बदलीला आक्षेप घेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला पत्र लिहिले होते.
यानंतर निवडणूक आयोगाने वेगवेगळया राज्यातल्या काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश दिले आहेत. ज्यामध्ये मुंबईचे कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त देवेन भारती यांचेही नाव आहे. देवेन भारती यांच्या बदलीनंतर ताबडतोब दुसरे आयपीएस अधिकारी त्यांची जागा सांभाळणार आहेत. मात्र, अद्याप कुठल्या अधिकाऱ्याला ही जबाबदारी मिळते, हे अजून गुलदस्त्यात आहे.