मुंबई - राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा आज (ता.१९) थंडावल्या. राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी सोमवारी 21 ऑक्टोंबरला मतदान होत असून मतदानासाठी आता एकच दिवस राहिला आहे. यंदा ३२३७ उमेदवार विधानसभा निवडणुकीत आपले नशिब आजमावत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी यावेळी प्रचारात आघाडी घेत आपआपली शक्ती पणाला लावली होती. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले.
हेही वाचा - 'भाजपच्या मंत्र्याचं काम अर्थव्यस्था सुधारणे आहे, कॉमेडी सर्कस चालवणे नाही'
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी २१ सप्टेंबरला आचारसंहिता लागू झाली होती. त्यानंतर सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले होते. ७ ऑक्टोबरला उमेदवार निश्चिती झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली होती. महाराष्ट्रभर धडाडलेल्या प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. आचारसंहितेच्या नियमांनुसार आता येथून पुढे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसापर्यंत प्रचार करता येणार नाही. असे असले तरी उमेदवारांचा छुप्या पद्धतीने प्रचार सुरूच असणार आहे. निवडणुकीचा प्रचार संपला असला तरी उमेदवारांची धाकधूक मात्र वाढली आहे.
हेही वाचा - राजकारण करताना समाजकारणही गरजेचे, हे साहेबांनी आम्हाला शिकवले आहे- रोहित पवार