ETV Bharat / state

'वंचित' पासून दूर होणं 'एमआयएम'च्या पथ्थ्यावर पडणार?

author img

By

Published : Sep 19, 2019, 12:11 PM IST

Updated : Sep 19, 2019, 12:25 PM IST

लोकसभेत एमआयएम आणि वंचित फॅक्टरने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत शिवसेना-भाजपच्याही काही उमेदवारांचे धाबे दणाणून टाकले होते. हैदराबाद मुख्यालय असलेल्या 'एमआयएम'ने महाराष्ट्राच्या राजकारणात कसा शिरकाव केला पाहुयात सविस्तर...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

मुंबई - लोकसभा निवडणुकांमध्ये एकत्रपणे लढणारे प्रकाश आंबेडकर यांचा वंचित आणि औवेसी यांचा एमआयएम पक्ष आता विधानसभेत वेगवेगळे लढणार आहेत. लोकसभेत एमआयएमला दलित मते मिळाही होती. मात्र, त्यांची मुस्लीमबहुल मते हे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना पडली नसल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. तसेच विधानसभेला फक्त 8 जागा एमआयएमला देणार असल्याचे सांगून प्रकाश आंबेडकरांनी एकप्रकारे एमआयएमची चेष्टाच केली असल्याच्या बोलले गेले. त्यामुळेच विधानसभेत हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढत असून याचा कोणाला फायदा होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसभेत एमआयएम आणि वंचित फॅक्टरने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत शिवसेना-भाजपच्याही काही उमेदवारांचे धाबे दणाणून सोडले होते. मात्र हैदराबाद मुख्यालय असलेल्या 'एमआयएम'ने महाराष्ट्राच्या राजकारणात कसा शिरकाव केला त्याबाबतचा हा सविस्तर वृत्तांत...

हेही वाचा - काँग्रेसचा मास्टरप्लान ! त्यामुळे पक्ष राज्यात पुन्हा मारणार मुसंडी?

काय आहे 'एमआयएम'चा इतिहास -

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) १९२६ साली स्थापन झालेल्या या पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून एमआयएमचे वर्चस्व असून येथील खासदार असदुद्दीन ओवैसी हे एमआयएमचे पक्षप्रमुख आहेत.

महाराष्ट्रात 'एमआयएम'चा मराठवाड्यातून शिरकाव -

हेही वाचा - युती झाल्यास औरंगाबाद मध्यमध्ये एमआमएमला बसू शकतो फटका

हैदराबादमध्ये एक खासदार सात आमदारांची ताकद असलेल्या एमआयएमबद्दल मराठवाडय़ात २०१० नंतर आकर्षण निर्माण झाले. त्यानंतरच्या काळात हैदराबादच्याजवळ आणि मराठवाड्यातील नांदेडमध्ये एमआयएमने पद्धतशीरपणे शिरकाव केला. २०१२च्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमचे ११ नगरसेवक निवडून आले आणि राजकीय वातावरण बदलले. एमआयएमच्या वाढीचा फटका त्यावेळी साहजिकच काँग्रेसला बसला होता.

'एमआयएम'चे 'मिशन महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2014'

नांदेडमध्ये पहिले यश मिळवल्यानंतर एमआयएमने मराठवाड्यात पाय पसरायला सुरुवात केली. मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमध्ये एमआयएमला विधानसभेतील पहिले यश मिळाले. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्य मतदारसंघातून इम्तियाज जलील आणि मुंबईमधून वारीस पठाण हे दोन आमदार निवडून आले. त्यावेळी काही मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना एमआयएमचा फटका बसला होता. 2014च्या विधानसभेनंतरच राज्याच्या राजकारणात एमआयएमचा बोलबाला सुरू झाला.

औरंगाबाद, बीड, अमरावतीतही 'एमआयएम'चा बोलबाला -

विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ झालेल्या औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमचे २५ नगरसेवक निवडून आले होते. विशेष म्हणजे यातील पाच नगरसेवक हे राखीव वार्डातून विजयी झाले होते. तर, दुसरीकडे बीड नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाने चांगली लढत दिली. याठिकाणी एमआयएमचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता.

अमरावती महानगरपालिकेतही एमआयएमचे दहा नगरसेवक मुस्लीमबहुल प्रभागांमधून निवडून आले. राज्यातील मुस्लीमबहुल भागांमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यावर भर देण्यात आला. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाने प्रवेश केला असून येथेही एमआयएमचे नगरसेवक आहेत. मुंबईसह राज्याच्या अन्य भागांमध्ये एमआयएमची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही.

सेनेचा किल्ल्याला सुरूंग लावत एमआयएमचा राज्यातील 'पहिला खासदार' -

नांदेड महानगरपालिकेपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरुवात करणारा एमआयएम पक्षाने आता संसदेतही धडक मारली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जिथे संपूर्ण देशात मोदी आणि भाजप लाट होती तिथे औरंगाबाद मतदारसंघातून शिवसेनेचे चारवेळा खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी अटीतीच्या लढतीत पराभव केला. इम्तियाज जलील यांच्या रुपाने एमआयएमचा महाराष्ट्रातील पहिला खासदार लोकसभेत गेला.

विधानसभेत वंचित, एमआयएम वेगळे लढणार -

लोकसभा निवडणुकीत एमआयएमने भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत हातमिळवणी केली होती. दलित-बहुजन आणि मुस्लिम मतांच्या जोरावर 'वंचित-एमआयएम' आघाडीने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढले होते. २०१९ लोकसभा निवडणूकीत या आघाडीला एका खासदारपदासह ४ लाख मते मिळाली होती. विधानसभा निवडणुकीत ही युती काँग्रेस-राष्ट्रवादीला आणखी जड जाणार असे कयास लावले जात असतानाच जागा वाटपावरुन वंचित-एमआयएमची युती तुटली.

मुस्लीम मते मिळाली नसल्याचा आंबेडकरांचा आरोप

एमआयएमने आंबेडकरांसोबत युती करुन बहुजन मतांच्या जोरावर एक खासदार निवडून आणला, मात्र वंचित आघाडीला मुस्लिम मते मिळाली नसल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. आंबेडकर स्वतः अकोला आणि सोलापूर येथून लोकसभा लढले. या दोन्ही मतदारसंघात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर एमआयएम प्रमुख ओवेसींनी म्हटले होते की काँग्रेसने मुंबईहून मौलवींना बोलावून मुस्लिममते आपल्या पारड्यात पाडून घेतली. येथूनच या युतीला घरघर लागल्याचे पाहायला मिळते.

विधानसभा निवडणुकीत आंबेडकर एमआयएमला आठ जागा देण्यास तयार होते. मात्र एक खासदार, दोन आमदार आणि राज्यात १५० नगरसेवक असल्याचा दावा करणाऱ्या एमआयएमची १०० जागांची मागणी होती. युती तुटण्याच्या क्षणी त्यांनी ७० जागा मिळाल्यातरी युती कायम राहील असे म्हटले होते. अखेर जागा वाटपाचा तिढा सुटला नाही आणि एमआयएमने युती तुटल्याचे पत्रक पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अर्थात खासदार इम्तियाज जलील यांच्या सहीनिशी प्रकाश आंबेडकरांना पाठवले आणि दलित-बहुजन-मुस्लीम हा प्रयोग राज्यात अर्ध्यावरच संपुष्टात आला.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Sep 19, 2019, 12:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.