ETV Bharat / state

MNS Deepotsav : ठाकरे, शिंदे फडणवीस एकाच मंचावर; एकनाथ शिंदेंनी केली राज ठाकरेंकडे 'ही' खंत व्यक्त

मनसेच्या शिवाजी पार्क येथील दीपोत्सवाचं उद्घाटन ( Inauguration of Deepotsava at Shivaji Park ) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) मनसे प्रमुख राज ठाकरे ( MNS chief Raj Thackeray ) यांच्या उपस्थितीत झालs.

Inauguration MNS Deepotsav
Inauguration MNS Deepotsav
author img

By

Published : Oct 21, 2022, 10:22 PM IST

मुंबई - मनसेच्या शिवाजी पार्क येथील दीपोत्सवाचं उद्घाटन ( Inauguration of Deepotsava at Shivaji Park ) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) मनसे प्रमुख राज ठाकरे ( MNS chief Raj Thackeray ) यांच्या उपस्थितीत झालं. याप्रसंगी झालेल्या छोटेखानी भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्याचबरोबर याप्रसंगी मनसे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या कानात काहीतरी पुटपुटले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मनसे अध्यक्षांचे आभार मानले. ते आभार कशासाठी मानले ते जाणून घेऊया.

यंदा सर्व उत्सव जोरात - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्क येथील मनसे दीपोत्सवाचं उद्घाटन. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सर्वांना दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. हा दीपोत्सव गेली दहा वर्ष आयोजित केला जातो. या आनंदमय कार्यक्रमाला उपस्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बाळा नांदगावकर, शर्मिला वहिनी आहेत. शिवाजी पार्कवर गेली दहा वर्ष दीपोत्सवाचं आयोजन होते आहे. परंतु मागच्या दोन वर्षात आपल्याला उत्सव साजरा करताना काही निर्बंध होते. परंतु यंदा हा उत्सव जोरात होत आहे. सर्वजण आपापल्या परीने हा उत्सव साजरा करीत आहेत.

उद्धव ठाकरे यांना टोमणा? पुढे मुख्यमंत्री म्हणाले की,यावर्षी राज साहेब आम्ही सर्व सण उत्सव जोरात करायचे ठरवले आहे. आम्ही जनतेला कमिटमेंट केलेली आहे. यंदा गणपती, नवरात्री उत्सव दिवाळी ही जोरात होईल .असे आम्ही ठरवलं प्रत्यक्षात तसे कार्यक्रम झाले आहेत. थोडा मोकळा श्वास जनता घेत आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण सर्वजण कसे दाबून बसले होते. मागे आम्हाला इच्छा असून इकडे येता येत नव्हतं. त्याला योगायोग लागतो, असे सांगत शिंदे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झाला नसल्याने शिंदे यांनी अप्रत्यक्ष खंत व्यक्त केली.

राज ठाकरे यांची स्तुती - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना मध्येच मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या कानात काहीतरी पुटपुटले. त्यानंतर लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची स्तुती करायला सुरुवात केली. भाजपने अंधेरी पूर्व, पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी राज ठाकरे यांनी पत्र दिलं होतं. त्याची आठवण सुद्धा शिंदे यांनी करून दिली. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही राज ठाकरे यांनी जातीने लक्ष दिल असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पुढे एकनाथ शिंदे राज ठाकरे यांना म्हणाले की, जनतेचे प्रश्न आहेत. तुम्हाला अनेक लोक भेटत असतात विनंती करत असतात. सरकारच्या माध्यमातून आपण ते सोडवू शकतो. मागेही तुम्ही आलात.

मी सुद्धा तुमच्या घरी गणपतीला आलो. आपणही सर्व माझ्याकडे आलात हे सर्व चांगलं वातावरण सगळीकडे आहे. त्यामुळे तुम्ही कधीही जे काही सांगता ते लोकांच्या हिताचे असते. शेतकऱ्यांनाही मदत झाली पाहिजे, आधार दिला पाहिजे हे सुद्धा तुम्ही सांगितले. आम्ही दोघेही उशिरापर्यंत काम करत असतो म्हणून रात्री, अपरात्री, मध्यरात्री आमच्याकडे कधीही येऊन तुम्ही भेटू शकतात. दिवाली आनंदात गेली पाहिजे. सरकारनेही ठरवले आहे. शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे. त्यांच्या पाठीशी उभ राहिल पाहिजे. सर्व नियम धाब्यावर बसवत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदत देण्याचे आम्ही आदेश दिले आहेत. ज्या काही आपल्या सूचना आहेत त्या ऐकून घेऊ. आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू. बळीराजाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाहीत. असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.